Vasant More Sakal
पुणे

Vasant More MNS : 'हिंमत असेल तर मनसेच्या वाघाला विरोधीपक्षनेता करा, दहशत...'; वसंत तात्यांची गर्जना

"अरे म्हणजे तुम्ही काय महाराष्ट्राची सत्ता आपापसात वाटून घेताय का? सत्ताधारी तुम्हीच आणि विरोधी पक्षात पण तुम्हीच."

दत्ता लवांडे

पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंड केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत असल्याचं सांगतिलं असून शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राजकारणावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून "तुम्ही महाराष्ट्राची सत्ता आपापसांत वाटून घेताय अशी खोटक टीका करत मनसेच्या आमच्या वाघाला विरोधीपक्षनेता करा मग तुम्हाला कळेल दहशत काय असते ते" असं मत व्यक्त केलं आहे.

"२०१९ ते २०२३ या ४ वर्षांत झालेल्या राजकीय खेळात मा. श्री. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, मा. श्री.अजितदादा पवार ३ वेळा उपमुख्यमंत्री, १ वेळा विरोधीपक्षनेता, मा. श्री.देवेंद्र फडणवीस १ वेळ मुख्यमंत्री, १ वेळ विरोधी पक्षनेता १ वेळ उपुख्यमंत्री आणि आता थोड्याच दिवसात कदाचित पुन्हा मुख्यमंत्री, आता वर्षभर झाले श्री. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि आता परत मा. जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेता.

अरे म्हणजे तुम्ही काय महाराष्ट्राची सत्ता आपापसात वाटून घेताय का? सत्ताधारी तुम्हीच आणि विरोधी पक्षात पण तुम्हीच. हिम्मत असेल तर मनसेच्या या विधानसभेतील वाघाला किमान एकदा विरोधी पक्षनेता करा, मग तुम्हाला कळेल विरोधी पक्षनेत्याची दहशत काय असते." अशा आशयाचं ट्वीट मनसे नेते वसंत मोरे यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT