Dispute Case sakal
पुणे

धायरीत किरकोळ कारणावरून टोळक्‍याकडून हॉटेल मालकासह कामगारावर वार

कामगारांवर लोखंडी हत्यारांनी केले वार; हॉटेल मालकासह दोन कामगार गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून टोळक्‍याने हॉटेल मालकासह त्यांच्या दोन कामगारांवर लोखंडी हत्यारांनी वार केले. या घटनेत हॉटेल मालकासह त्यांचे दोन कामगारही गंभीर जखमी झाले. हि घटना शनिवारी दुपारी चार वाजता धायरी येथे घडला. (Pune Nwes)

मयूर मते (वय 33), इसराफील, अश्‍फाक (पूर्ण नावे मिळाली नाहीत) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन टोळक्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरीतील गणेशनगरमध्ये मयूर मते यांचे "गारवा बिर्याणी हॉटेल' नावाचे हॉटेल आहे. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्यांची एका ग्राहकासोबत किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली होती.

या वादाचा राग धरून संबंधीत तरुणाने त्याच्या इतर साथीदारांना हॉटेलमध्ये बोलाविले. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून त्यांच्याकडील लोखंडी धारदार हत्यारांनी मते यांच्यावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मते यांचे कामगार इसराफील व अश्‍फाक हे दोघेही भांडणामध्ये पडले. त्यांनी टोळक्‍यापासून मते यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा टोळक्‍याने त्यांच्या कामगारांवरही वार केले. त्याचबरोबर हॉटेलमधील बिर्यानीचे पातेले, त्यावरील झाकणे, लोखंडी खुर्च्या, ट्रे मते व त्यांच्या कामगारांवर फेकून मारले. त्यानंतर हॉटेलबाहेर जमलेल्या लोकांना आणि शेजारील दुकानदारांना शिवीगाळ करून त्यांच्यातही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक खेडकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT