Crime News Esakal
पुणे

Crime News: धक्कादायक! पुण्यातील मंगला टॉकीजबाहेर तरूणाचा निर्घृण खून; चित्रपट पाहून बाहेर येताच कोयते, तलवार, दगडाने ठेचले

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील मंगला टॉकीजसमोर तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गँगची दहशत होती, त्यानंतर आता टोळक्याने तलवार आणि कोयत्याने हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील मंगला टॉकीजसमोर तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

ही घटना मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तरुण चित्रपट पाहून बाहेर येताच टोळक्याने तलवार आणि कोयत्याने तरुणावर हल्ला केला व दगडाने ठेचून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नितीन मोहन म्हस्के (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नितीन म्हस्के हा मंगळवारी रात्री शिवाजीनगर परिसरातील मंगला टॉकीज या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पूर्व वैमनस्याच्या वादातून एका टोळक्याने त्याच्यावर कोयते, तलवार आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली आहे. मृत नितीन म्हस्केवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच वादातून त्याची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मृत नितीन मस्के व त्याच्या साथीदारांनी मिळून आरोपी सागरवर किरकोळ वादातून शस्त्राने हल्ला केला होता. यावेळी आरोपी सागरला मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा म्हस्के आणि त्याच्या साथीदारांवर दाखल करण्यात आला होता. मात्र, या भांडणाच्या रागातून आरोपी नितीनच्या मागावर होते.

मंगळवारी रात्री नितीन म्हस्के चित्रपट पाहून चित्रपटगृहाबाहेर आला त्यानंतर अचानक त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या घटनेत नितीन म्हस्केचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. तर संबधीत घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT