pune sakal
पुणे

रागाने बघितल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन टोळक्‍याकडून तरुणांवर कोयत्याने वार

हि घटना गुरूवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास लोहियानगर येथील श्रीनाथ डेअरीसमोर घडली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रस्त्याने जाताना रागाने बघितल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तरुणासह टोळक्‍याने दोन तरुणांवर कोयत्याने वार केले. याबरोबरच मोठमोठ्याने आरडाओरडा करीत, शस्त्रे हवेमध्ये फिरवून दहशत निर्माण केली. हि घटना गुरूवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास लोहियानगर येथील श्रीनाथ डेअरीसमोर घडली. जुबेर ऊर्फ वडी मुश्‍ताक शेख (वय 20, रा. लोहियानगर), आकीब आसद दुल्लाह शेख (वय 21, रा.कोंढवा) यांच्यासह चौघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News)

याप्रकरणी फैजान शेख (वय 23, रा.मीठानगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र गुरूवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास लोहियानगरमधील श्रीनाथ डेअरीसमोर गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथून जाणार जुबेर शेख हा फिर्यादीकडे रागाने बघत जात होता. फिर्यादीने त्यास रागाने बघितल्याचा जाब विचारला. त्यावेळी जुबेरने त्याच्या साथीदारांना बोलावून फिर्यादीवर कोयत्याने वार केले. त्यानंतर फिर्यादीचा मित्र सलमान याच्यावरही वार केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. आरोपींनी तेथून पळून जाताना मोठमोठ्याने आरडाओरडा करीत तसेच त्यांच्याकडील शस्त्रे हवेत फिरवून दहशत निर्माण केली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही.एस.जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT