The mob broke into the shop and attacked the youth with a sharp 
पुणे

नाना पेेठेतील टोळक्याची दहशत! दुकानात घुसून तरुणावर कोयत्याने वार

सकाळवृत्तसेवा

पुणे : कटिंग सलूनच्या दुकानामध्ये घुसून दुकानातील तरुणावर कोयत्याने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न करीत दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्‍यास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. यात सहभागी असलेल्या सहा अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना रविवारी रात्री पावणेआठ वाजता नवी पेठेतील हत्ती गणपती मंदिरासमोरील एका दुकानामध्ये घडला.याप्रकरणी सनी महापुरे (वय १९, रा. फालेनगर, कात्रज) याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सहा जणांना अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापुरे याचे सदाशिव पेठेतील हत्ती गणपती मंदिराजवळ सलूनचे दुकान आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास आदर्श मिसाळ नावाचा तरुण दुकानामध्ये होता. त्यावेळी १० ते १२ जण कोयते व हत्यारे घेऊन दुकानामध्ये शिरले. त्यांनी दुकानामध्ये येऊन ‘केएम कुठे आहे’, असे म्हणत मिसाळ यास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर आदर्शला जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने कोयत्याचा वार चुकवून ‘केएम मी नाही’ असे सांगून तेथून पळ काढला. त्यानंतर आरोपींनी कोयत्याने दुकानातील काचा फोडल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या घटनेनंतर आरोपींनी ‘आपण नाना पेठेतील भाई आहोत, आमच्या नादाला कोणी लागल्यास एका-एकाला सोडणार नाही, केएम तुला सोडणार नाही़’’ अशा शब्दात धमकी देत हत्यारे हवेत फिरवून, आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. त्यानंतर आरोपी पेरूगेटच्या दिशेने निघून गेले. या घटनेमुळे नागरिकांनी घाबरून आपली दुकाने बंद केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय टिकोळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना संबंधित आरोपी व अल्पवयीन मुले नाना पेठेतील डोके तालमीजवळ लपून बसल्याची खबर मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यांना अटक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT