पुणे

सायबर चोरट्यांच्या ताब्यात तुमचा मोबाइल तर नाही ना?

CD

पुणे, ता. १६ : मोबाइलवर अनोळखी लिंकवर क्लिक किंवा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या बँक खात्यातून क्षणात लाखोंची रक्कम गायब होण्याचे प्रकार वाढत आहेत. शहरात गेल्या १५ दिवसांत मोबाइल हॅक करून आणि ‘रिमोट ॲक्सेस’ मिळवून ११ नागरिकांची सुमारे ७६ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. यात स्वारगेट, वाघोली, लोहगाव, कोंढवा, कोथरूड, विमानतळ आणि भारती विद्यापीठ परिसरातील नागरिकांचा समावेश आहे.
सायबर चोरटे आता नागरिकांच्या मोबाइलचा तांत्रिक ताबा (ॲक्सेस) मिळवत आहेत. आरटीओचे ई-चलन, थकीत गॅस बिलाचा संदेश आणि मोफत चित्रपटांच्या जाहिरातींच्या आमिषांना बळी पडून नागरिक बनावट ‘एपीके’ फाईल डाउनलोड करत आहेत. ही फाईल फोनमध्ये इन्स्टॉल होताच चोरट्यांना मोबाइलचा ॲक्सेस मिळतो. त्यानंतर नागरिकांचे कॉल आणि बँकेचे ओटीपी परस्पर दुसऱ्या क्रमांकावर पाठवून बँक खाती रिकामी केली जात आहेत.

असा रचला जातो सापळा :
बनावट ‘एपीके’ फाईल : व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे आरटीओ ई-चलन आणि गॅस बिल अपडेट करण्याच्या नावाखाली बनावट लिंक पाठवून ‘एपीके’ फाईल डाउनलोड करण्यास भाग पाडले जाते.

रिमोट ॲक्सेस : फोन हॅक केल्यानंतर चोरटे मोबाइलचा रिमोट ॲक्सेस घेतात. त्यानंतर बँकेचे सर्व ओटीपी व कॉल स्वतःच्या क्रमांकावर पाठवून पैसे काढतात.


अकाउंटंटचा मोबाइल हॅक :
एका हॅकरने वाघोलीतील ‘मेवारा मायनिंग सर्व्हिसेस’ कंपनीच्या कार्यालयातील महिला अकाउंटंटचा मोबाइल हॅक केला. फोनचा ताबा मिळवताच, त्याने कंपनीच्या संचालकांचे भाऊ ‘आशिष सर’ यांचा क्रमांक डिलीट करून त्या जागी स्वतःचाच मोबाइल क्रमांक ‘आशिष सर’ या नावाने सेव्ह केला. त्यानंतर व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून १६ लाख रुपये एका बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितले. मालकाच्या भावाचाच निरोप समजून अकाउंटंटने ती रक्कम पाठवली. काही वेळाने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सायबर चोरटे ‘एपीके’ फाईल आणि रिमोट ॲक्सेसचा वापर करून नागरिकांचे मोबाइल हॅक करत आहेत. नागरिकांनी व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. विशेषतः ‘.apk’ एक्स्टेंशन असलेल्या फाईल्स डाउनलोड करू नयेत.
- स्वप्नाली शिंदे,
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर

इतर प्रमुख घटना :
- लोहगाव : ‘एपीके’ फाईलद्वारे १२ लाख रुपये आणि रिमोट ॲक्सेसद्वारे साडेसात लाखांची फसवणूक.
- विमानतळ : महिलेच्या मोबाइलमध्ये ‘एपीके’ फाईल पाठवून आठ लाख ७० हजार रुपये काढले.
- स्वारगेट : बनावट ‘ई-चलन’ ॲपद्वारे व्यावसायिकाला सहा लाख ८१ हजार रुपयांचा गंडा.
- भारती विद्यापीठ : गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली सव्वासहा लाख आणि वाहतूक दंड लिंकद्वारे साडेतीन लाख रुपये लंपास.
- कोंढवा : गॅस बिल संदेशाद्वारे ज्येष्ठ नागरिकाचे सहा लाख रुपये लंपास.

फसवणूक टाळण्यासाठी हे करा :
- प्ले-स्टोअर किंवा ॲप-स्टोअर व्यतिरिक्त इतर कोणत्याही लिंकवरून ॲप डाउनलोड करू नका.
- आरटीओ चलन किंवा गॅस बिलाची खात्री अधिकृत संकेतस्थळ किंवा ॲपवरच करा.
- फोन हॅक झाल्याचा संशय आल्यास इंटरनेट बंद करा.
- बँक खात्याचा आणि यूपीआय पासवर्ड त्वरित बदला.

मोबाइल हॅक झाला आहे का ते पाहण्यासाठी:
*#६७# डायल करा

मोबाइल हॅक झाल्यास तो काढून टाकण्यासाठी:
##००२# डायल करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: सूर्यकुमारचं वादळ पुन्हा घोंगावलं! ९ चौकार अन् ७ षटकारांसह अर्धशतक करत मुंबईला मिळून दिला मोठा विजय

Supreme Court: सुनावणीपूर्वी इंडिया आघाडीची आक्रमक खेळी; मुख्य निवडणूक आयुक्तांना 48 प्रश्न विचारण्याची मागितली परवानगी

Spine Surgery: जन्माची वाट न पाहता आईच्या गर्भातच बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया; AIIMSच्या डॉक्टरांनी रचला इतिहास

Gold-Silver Crash: सोनं-चांदीचे भाव कोसळले! लग्नसराईआधी वर्षातील सर्वात स्वस्त दर; नेमकं कारण काय? आणखी स्वस्त होणार?

Latest Marathi News Update : मंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानातील सुरक्षारक्षकांना मारहाण प्रकरण; न्यायालयाकडून तिन्ही आरोपींना जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT