Eye Spects Sakal
पुणे

मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड, टॅबमुळे डोळ्यांवरील ताण वाढला; हे आहेत उपाय

मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड, टॅब आदी गॅझेटस आता जीवनशैलीचा भाग झाल्यामुळे नागरिकांच्या डोळ्यांवरील ताणही वाढू लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मोबाईल, लॅपटॉप, आयपॅड, टॅब आदी गॅझेटस आता जीवनशैलीचा भाग झाल्यामुळे नागरिकांच्या डोळ्यांवरील (Eyes) ताणही (Strain) वाढू लागला आहे. त्यातून अकाली चष्मा (Spects) लागण्याचेही प्रमाण वाढू लागले आहे. अगदी शाळकरी मुलांचाही (Child) त्यात समावेश आहे. त्यामुळे नेत्रविकार टाळण्यासाठी विविध उपाय (solutions) करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

शाळा, महाविद्यालयांचे वर्ग, योगासने, गायन, वादन, चित्रकला, नृत्य आदींचे क्लास सध्या ऑनलाइन सुरू आहेत. अजूनही बऱ्याच कार्यालयांत वर्क फ्रॉम होम सुरू आहे. वेबसिरीज वारंवार पाहण्याचीही क्रेझ आली आहे. गेमिंग तसेच ऑनलाइन खरेदी-विक्रीही अनेकजण करतात. त्यामुळे आबालवृद्धांचा दिवसांतील बराच वेळ गॅझेटच्या संगतीत जात आहे. त्यातून स्क्रीन टाइम वाढून डोळ्यांवर ताण येऊन नेत्रविकारांत वाढ होत आहे. या शिवाय लॅपटॉप, मोबाईल, संगणकाच्या समोर बसून होणारी पाठ, मान, कंबरदुखी, झोप पूर्ण न होणे, सतत फोन वर बोलून किंवा हेडफोन लावल्यामुळे श्रवण दोषही वाढते आहेत.

गॅझेट्सचे होणारे परिणाम

- रेडिएशन डोळे आणि त्वचेसाठी हानिकारक

- निद्रानाश

- सतत लॅपटॉप, कॉम्प्यूटरसमोर बसून काम केल्यावर येणारा लठ्ठपणा, कंबर व पाठदुखी

- श्रवणदोष

- एकटेपणा आणि वाढता मानसिक ताण

काही उपाय

- गॅझेटसचा वापर कमी करा

- दर एका तासाने स्क्रीन पासून दूर होऊन २ मिनिटे बाहेर फेरफटका मारा

- भरपूर पाणी प्या, त्यामुळे शारीरिक व्याधी कमी होतील

- ताठ बसा, त्यामुळे कंबर व पाठदुखी होणार नाही

- वजन वाढू नये व नियमित व्यायाम आवश्यक

- जेवताना, झोपण्यापूर्वी गॅझेटसचा वापर टाळा

- नवीन छंद जोपासा, त्याला अधिक वेळ द्या

- चित्रपट, सिरियल्स, सिरीज, याला वेळेचे बंधन असावे

इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर बंद नाही मात्र कमी नक्कीच करू शकतो. सर्व गोष्टी ऑनलाइन झालेल्या असल्या तरी पर्याय असून सुद्धा बहुतेक मूल बाहेर खेळायला जात नाही. एका वैद्यकीय अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे की घरात मोबाईल गेम खेळणाऱ्यापेक्षा मैदानी खेळ खेळणाऱ्या मुलांना चष्मा नसतो. कामामुळे जे नागरिक स्क्रीनचा वापर जास्त करतात त्यांनी दर २० मिनिटांनी २० सेकंदासाठी डोळे बंद करावे. त्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, ताण येणे किंवा डोळे कोरडे पडण्याच्या तक्रारी कमी होतील.

- डॉ आदित्य केळकर, नेत्ररोगतज्ज्ञ

गॅझेटसमुळे आपला मेंदू कार्यरत राहण्यापेक्षा त्यावर ताण येतो. स्ट्रेस आणि नैराश्याचे (डिप्रेशन) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कारण आपले मन नको त्या विचारांमधे अडकून राहते. त्यावर उपाय म्हणजे छोट्या छोट्या कामांसाठी मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरण्यापेक्षा आपल्या स्मरणशक्तीवर जोर पडायला हवा. पुस्तक वाचनासारखे छंद जोपासले तर नव्या विचारांमधे मन रमेल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटस् दूर राहतील.

- शर्वरी देशपांडे

माझा मुलगा ओम पहिलीमध्ये आहे. सगळ्या गोष्टी ऑनलाइन झाल्या आहेत. म्हणून मी खबरदारी घेते की तीन तासांपेक्षा जास्त त्याचा स्क्रीन टाइम नसेल. मुलाला करमणूक म्हणून बुद्धीबळ आणि बुद्धीला चालना देणारे खेळ देते. मोबाईलवर गेम त्याला १० मिनिटांपेक्षा जास्त खेळू देत नाही.

- पौर्णिमा हातेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPSC CSE Notification 2026 : UPSC नागरी सेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू

Pune Bar Election : पुणे बार निवडणुकीत साडेसात हजार वकिलांनी बजावला मतदानाचा हक्क, व्यवस्थापनावर नाराजी

Pune News : गंजपेठेत विवाहितेच्या खूनप्रकरणी पतीसह तिघांना अटक; पोलिसांचा सखोल तपास

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीमुळे नोकरदार व व्यावसायिकांची त्रासदायक प्रतीक्षा

U19 World Cup: विश्वविक्रमासह भारतीय संघ फायनलमध्ये! अफगाणिस्तानला नमवले, आता जेतेपदासाठी इंग्लंडशी भिडणार

SCROLL FOR NEXT