Mobile-Railway-Ticket 
पुणे

मोबाईल रेल्वे तिकीट होतेय लोकप्रिय!

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलचे तिकीट मोबाईलवरून घेण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. एका महिन्यातच सुमारे एक लाख प्रवाशांनी मोबाईलवरून तिकीट घेतले आहे. 

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने लोकलच्या पुणे-लोणावळा प्रवाशांसाठी मोबाईलवरून तिकीट उपलब्ध करून देण्यास चार एप्रिल रोजी प्रारंभ केला आहे. रेल्वे स्थानकावर तिकिटांसाठी मोठी रांग असते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘यूटीएस’ ॲप तयार केले आहे. ‘गुगल’च्या प्ले स्टोअरमध्येही ते उपलब्ध आहे. स्थानकापासून दोन किलोमीटर अंतराच्या परिघात हे तिकीट प्रवाशांना मोबाईलवरच उपलब्ध होते. त्याची प्रिंटआउट काढण्याचीही गरज नसते. तिकीट तपासनिसांना मोबाईल संचावरील तिकीट दाखविले तरी, चालू शकते. त्यामुळे सहजपणे कमीतकमी वेळात उपलब्ध होणारे रेल्वेचे मोबाईल तिकीट प्रवाशांमध्ये लोकप्रिय होत आहे. 

पुणे-लोणावळा मार्गावरील प्रवाशांना या ॲपची माहिती देण्यासाठी प्रशासनाने लोणावळा मार्गावरील वेगवेगळ्या स्थानकांवर फलकही लावले आहेत. तसेच प्रवासी संघटना आणि ग्रुपनांही या बाबतची माहिती दिली जात आहे. ‘आर वॉलेट’वरून प्रवाशांनी तिकीट घेतल्यास त्यांना सुमारे साडेपाच टक्के सवलतही मिळते. नियमित प्रवाशांना तिकीट आणि मासिक पासचेही नूतनीकरण करता येते, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

 स्थानकापासून दोन किलोमीटरच्या परिघात प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरून तिकीट मिळण्याची सुविधा 
वेगाने लोकप्रिय होत आहे. जास्तीत जास्त प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतल्यास रांगेत उभे राहण्याचा त्यांचा वेळ वाचेल.
-  कृष्णाथ पाटील, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे

पुणे विभागात एक महिन्यात सर्वत्र सुविधा
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात एक महिन्यात ही सुविधा सर्वत्र सुरू होणार आहे. अनारक्षित तिकीट प्रवाशांना मोबाईलवरून उपलब्ध होईल. पुणे-दौंड, पुणे-उरळी, पुणे-सातारा आदी विविध मार्गांवरील तिकीट मिळू शकेल. त्यासाठीची तांत्रिक तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT