mobile 
पुणे

या दुर्गम गावांतील लोकंही आता म्हणणार, "हॅलो' 

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्‍यातील अतिदुर्गम मावळ परिसरातील अठरा गावे "रिचेबल' होणार आहेत. या भागात आतापर्यंत कोणत्याही कंपनीच्या मोबाईलला रेंज नाही. पण, आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, या परिसरात लवकरच "बीएसएनएल'चा मोबाईल मनोरा उभारण्यात येणार आहे. 

या परिसरात मनोरा बसविण्यासाठी आज जागेची पाहणी केली. या वेळी "बीएसएनएल'चे मंडल अभियंता मोबाईल एस. आर. दिनकर, ग्रामीण मंडल अभियंता के. व्ही. दाभाडे, आर. आर. व्हिवाळे, पुणे जिल्हा दूरसंचार समिती सदस्य प्रवीण शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर, राष्ट्रवादीचे वेल्हे तालुका सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष खंडू गायकवाड, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष रमेश शिंदे, चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.

प्रवीण शिंदे यांनी सांगितले की, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी खासदार सुळे यांनी या परिसरात दौरा केला होता. त्या वेळी येथील ग्रामस्थांनी मोबाईल टॉवर बसविण्याची मागणी केली होती. या परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. या ठिकाणी जंगलाचा भाग आहे. तसेच, विविध ठिकाणी अपघात होत असतात. तातडीचा संदेश देण्यासाठी या परिसरात कोणतेही साधन नाही. त्यामुळे लोकसभा अधिवेशना वेळी खासदार सुळे यांनी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री सुरेश धोत्रे यांची भेट घेऊन भोर, वेल्हे, मुळशी, पुरंदर तालुक्‍यातील ग्रामीण व डोंगराळ भागात "बीएसएसएनल'चे मोबाईल मनोरे बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार "बीएसएनएल'च्या अधिकाऱ्यांनी सोमवारी भोरडी परिसरात जागेची पाहणी केली.

संतोष दसवडकर यांनी या मोबाईल मनोऱ्यासाठी स्वमालकीची जागा माफक दरात देण्याची तयारी दर्शविली आहे. जागा "बीएसएनएल'च्या ताब्यात घेण्याची कार्यवाही पंधरा दिवसांच्या आत पूर्ण करून तीन महिन्यांत मनोरा उभा करण्याची सूचना दिली आहे. 

या गावांत मिळणार सेवा 
या परिसरातील केळद, भोरडी, निगडे खुर्द, पिशवी, गुगळशी, पांगारी, माझगाव, कुंबळे, शेनवड, बालवड, गोपे, पासली, कोलंबी, वरोती, हारपुड, सिंगापूर, मोहरी, नाळवट, चांदवणे, गुहिणी, खुलशी, बार्शीमाळ, खोपडीवाडी, जाधववाडी, आदी गावांमध्ये "बीएसएनएल'ची मोबाईल सेवा उपलब्ध होणार आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हिवाळी अधिवेशानात राज्यात लागू होणार समान नागरी कायदा? CM फडणवीसांनी दिली मोठी अपडेट, काय म्हणाले?

Mohol Ganeshotsav : मोहोळ शहरात गणेश मूर्ती खरेदीसाठी मोठी गर्दी, गणेशोत्सवावर दुष्काळाचे सावट गणेश मूर्तीच्या किमती वाढल्या

Marathi News Live Updates : मनोज जरांगे आझाद मैदानावर उपोषणावर ठाम; १८ सप्टेंबरसाठी पोलिसांकडे परवानगीचा अर्ज

Moon Venus Conjunction Sky Event: चंद्रकोरीसोबत तेजस्वी शुक्राची दुर्मीळ युती; निरभ्र आकाशात नयनरम्य खगोलीय नजारा

Pune News : महापालिकेचे अधिकाऱ्यांना उतरावे लागणार रस्त्यावर; दर शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT