Mobile-Tab 
पुणे

शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुरवले 'मोबाईल टॅब'

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या या कठीण काळात शिक्षणाच्या क्षेत्राने वेगळंच वळण घेतलं आहे. मोबाईल हातात घेऊ नकोस असे म्हणणारे पालक आता स्वतः मुलांना मोबाईल घेऊन बस असं सांगत आहेत. ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे खरं तर हे चित्र बदलले आहे. परंतु या शिक्षण प्रणालीचा मोठा फटका बसत आहे तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना. त्यांची ही अडचण दूर करण्याचा संकल्प मात्र पुण्यातील सोळा वर्षीय युवकांना केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येऊ नये यासाठी 'विकास-आयफाय' उपक्रमांतर्गत साताऱ्यातील कवठे (मसूर) येथील श्री ज्योतिर्लिंग विद्यालयाला सुमारे 25 मोबाईल टॅब उपलब्ध करून दिले आहेत. 

कॅम्प येथील 'बिशॉप्स ज्युनिअर कॉलेज'मधील इयत्ता अकरावीत शिकत असलेल्या अयान शेख व अर्णव बन्सल या युवकांनी हा आगळा वेगळा उपक्रम सुरू केला. 
या उपक्रमाबाबत अयान म्हणाला, "कोरोनामुळे सध्या शाळा व महाविद्यालये बंद असून संपूर्ण अभ्यासक्रम हा ऑनलाईन माध्यमातून होत आहे. सर्व साधन उपकरणे उपलब्ध असल्यामुळे आम्हाला ऑनलाईन शिक्षण घेत असताना कोणतीच अडचण कधी जाणवली नाही. परंतु वारंवार माध्यमातून एक गोष्ट कानावर पडायची ती म्हणजेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांबाबतची. कित्येक विद्यार्थी अपुऱ्या सुविधांमुळे या ऑनलाईन अभ्यासक्रमापासून वंचित राहू लागले आहेत. त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुरळीत करण्याच्या अनुषंगाने 'विकास-आयफाय'ची कल्पना सुचली. याच्या माध्यमातून या गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी 'टॅब' देण्याचे ठरविले. यासाठी माझा मित्र अर्णव व इतर मित्र आणि नातेवाईकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यामुळे या 'मोबाईल टॅब'साठी आम्हाला दोन लाख 50 हजार रुपये जमा करता आले. तसेच या टॅबमूळे सध्या 35 हून अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ मिळत आहे." 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

"ही परिसरहीती कधी बदलणार याची माहिती नाही. पण त्यामुळे शिक्षण थांबू नये. तसेच शाळा व महाविद्यालये पूर्णपणे सुरू होईपर्यंत या विद्यार्थ्यांना नक्कीच या 'मोबाईल टॅब'चा लाभ मिळेल. सुविधांच्या अभावामुळे प्रतिभावान मुले विविध संधींपासून वंचित राहू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार." असे अर्णव याने सांगितले.
'विकास-आयफाय'च्या या उपक्रमात अयान व अर्णव समवेत तनय बजाज, अदिती मेहता, सोहम चंद्रचूड व कृष्णा वायळ यांचा देखील सहभाग आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gangwar : कोल्हापुरात गुंडाचा निर्घृण खून, गँगवारची शक्यता; मध्यरात्री पाठलाग करतानाचा थरारक Video

Chakan Update : पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हा दाखल होणार; चाकणमध्ये पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांचा इशारा

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणात; ‘कोठडीतील मृत्यूच्या संदर्भात मार्गदर्शक सूचनांसाठी शपथपत्र दाखल करा’

सर्जरी अर्धवट सोडली अन् नर्ससोबत संबंध ठेवण्यासाठी गेला पाकिस्तानी डॉक्टर, दुसऱ्या नर्सनं आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं अन्...

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

SCROLL FOR NEXT