पुणे

मंगळवेढ्याच्या आठवडा बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट दर सोमवारी लाखो रुपयांचे मोबाईल जातात चोरीला

CD

MGV26B16869
मंगळवेढा ः मंगळवेढ्यातील चोरच्या घटनांबाबत पोलिसांना निवेदन देताना सचिन डोराले, सचिन नागणे, क्रांती दत्तू, सोमनाथ बुरजे.

आठवडा बाजारात मोबाईल चोरांचा सुळसुळाट

मंगळवेढा, ता. ३ : मंगळवेढा शहरातील आठवडा बाजारात दर सोमवारी मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांवर ठोस कारवाई होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. गर्दीचा फायदा घेत चोरटे नागरिकांच्या खिशातील तसेच हातातील मोबाईल लंपास करीत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शहरात दर सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याच गर्दीचा फायदा मोबाईल चोरांकडून घेतला जात आहे. दर सोमवारी लाखो रुपयांचे मोबाईल चोरीला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. मात्र, या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे, साध्या वेशातील पोलिसांची गस्त वाढवावी आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत चोरीला गेलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत मिळवून द्यावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी सचिन डोराले, सचिन नागणे, क्रांती दत्तू, सोमनाथ बुरजे, सतीश दत्तू, अमोल सातपुते, राजवीर हजारे, देवदत्त पवार, महेश नागणे, शंकर गोवे, ईश्वर नामदे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, जागेवरच मृत्यू; शिंदेसेनेच्या नेत्यानं कट रचल्याचा आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

Satana Bribery Case: वडिलांच्या मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठीही लाच! सटाण्यातील सरकारी अधिकारी एसीबीच्या ताब्यात, नेमकं काय घडलं..

Pune Metro: बाणेर-बालेवाडीतील मेट्रो स्थानकांना डावलल्याने नागरिक रस्त्यावर; मेट्रो सुरू करण्यास विरोध, आंदोलनकर्ते ताब्यात

IND vs NZ : विराट कोहली न्यूझीलंडमध्ये सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडणार? सेहवागलाही मागे टाकण्याची संधी

Koyna Dam Water Release : कोयनेच्या विसर्गाने वाहू लागली 'कृष्णा'; शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत

SCROLL FOR NEXT