Mobile Toilet
Mobile Toilet Sakal
पुणे

Mobile Toilet : मोबाईल टॉयलेटच्या निविदेसाठी घाई अन् दबावतंत्र

​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - गणेशोत्सवाच्या काळात ४४ लाख रुपये खर्च करून मोबाईल टॉयलेटची निविदा काढण्यात आली. या सेवेत त्रुटी असल्याने त्याच्या अनेक तक्रारी गेल्या. त्यानंतर आता पुढील वर्षभरासाठी आणखी एक २५ लाख रुपयांची निविदा काढण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागात गडबड सुरु आहे. तसेच या निविदेत स्पर्धा होऊ नयेत यासाठी ठेकेदारांना तुम्ही निविदा भरू नका असे निरोप जात असल्याने याची प्रशासनातही चर्चा रंगली आहे.

महापालिकेतर्फे पालखी सोहळा, गणेशोत्सव या काळात नागरिकांच्या सोईसाठी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था केली जाते. यंदा गणेशोत्सवासाठी ठेकेदार नियुक्त केला होता, पण त्याने व्यवस्थित काम न केल्याने त्याला ५ लाख रुपयांचा दंड केला व त्याच्याकडून हे काम काढून घेण्यात आले.

त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या विविध भागत ४०० मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली. या प्रत्येक टॉयलेटला प्रतिदिन ११०० रुपये भाडे होते. गणेशोत्सवात यासाठी ४४ लाखाचा खर्च झाला आहे.

पण अनेक टॉयलेट स्वच्छ नव्हती, स्वच्छता गृहांच्या दाराला कडी नव्हती, परिसरात प्रकाश व्यवस्था नव्हती, स्वच्छतागृहाबाहेर पाण्यासाठी ड्रम ठेवला असला तरी पाणी घेण्यासाठी छोटे बकेट, मग व्यवस्था नव्हती. त्यामुळे ठेकेदाराच्या कार्य पद्धतीवर टीका करत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

गणेशोत्सवानंतर भविष्यात कोणताही उत्सव नसतानाही २५ लाख रुपयांची निविदा काढली आहे. त्यासाठी ७ ऑक्‍टोबर ते १४ ऑक्‍टोबर अशी मुदत आहे. या अल्पमुदतीच्या निविदा काढताना याचे अधिकार विभाग प्रमुखांकडेच असले पाहिजेत याची काळजी घेत २५ लाखापेक्षा कमी रकमेची निविदा काढली आहे.

आता निविदेची गरज काय आहे?, ही निविदा पुढच्या पालखी सोहळा, गणेशोत्सवासाठी असेल का?, सध्या कोणतीही गडबड नसताना अल्प मुदतीची निविदा का काढली? याबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता याची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत.

उपायुक्त संदीप कदम म्हणाले, ‘वारीच्या काळात १५ लाख तर गणेशोत्सवासाठी ४४ लाख रुपयांची निविदा होती. आगामी काळात महापालिकेने मोबाईल टॉयलेटची गरज पडू शकते यासाठी २५ लाख रुपयांचीच तरतूद उपलब्ध असल्याने तेवढ्याच रुपयांची पुढील वर्षभरासाठी निविदा काढली आहे. पुढच्या वर्षासाठी स्वतंत्र निविदा काढली जाईल. ही निविदा काढताना घाई केली नाही, त्याची मुदत उद्या संपणार आहे. निविदा भरण्यापासून कोणालाही रोखले जात नाही, किती जणांनी निविदा भरली हे कळेल.’

मंत्र्याच्या नावाने दबाव

प्रशासनावर वचक असलेला नेता अशी ओळख असलेल्या एका मंत्र्यांच्या पीएच्या माध्यमातून ही निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी हालचाल सुरु आहे. गणेशोत्सवातही मंत्र्याच्या पीएने अनेकांवर दबाव आणला होता. आता या २५ लाखाच्या निविदेतही ठेकेदारांना मंत्र्यांचे नाव घेऊन तुम्ही निविदा भरू नका असे कर्मचारी फोन करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Updates : पुण्यात पावसाचा उद्रेक! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

Pune Porsche Crash : कल्याणीनगर अपघातापूर्वी अन् नंतर नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

Mumbai Lok Saha Election : मुंबईत अनेक ठिकाणी संथगतीने मतदान! कळवा-मुंब्र्यात अनेकजण मतदान न करताच परतले

Lok Sabha Election: कल्याण पश्चिम, भिवंडी मतदारसंघात निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ; मतदार यादीतून हजारो नागरिकांची नावं गायब

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT