पुणे

वाल्मिक कराडने आतून फोन केल्याचा दावा बनावट;

CD

वाल्मीक कराडच्या
बराकीसमोर १२ कॅमेरे

मोबाईलच्या वापराचे खासदार सोनवणेंचे आरोप फेटाळले

बीड, ता. २ : केज तालुक्यातील हॉटेलचालक विलास घुले यांच्या हत्या प्रकरणात आपल्या मुलाला अडकवण्यासाठी बीडच्या जिल्हा कारागृहातून कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी गुरुवारी (ता. १) केज येथे पत्रकार परिषदेत केला होता. या कटासाठी मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडने कारागृहातून मोबाईलचा वापर केल्याचा दावा त्यांनी केला होता. मात्र, हे सर्व आरोप बीड कारागृह प्रशासनाने फेटाळले. यापूर्वी झालेल्या दोन उच्चस्तरीय चौकशीतही प्रशासनाची कोणतीही चूक आढळली नव्हती, असा दावा करत प्रशासनाने आपली बाजू मांडली.
कारागृह अधीक्षक राजाराम चांदणे यांनी शुक्रवारी (ता. २) याप्रकरणी स्पष्टीकरण देताना सांगितले, की ‘‘नियमानुसार प्रत्येक कैद्याला दर आठवड्याला तीन वेळा, १० मिनिटांसाठी तीन नोंदणीकृत नातेवाईकांशी बोलण्याची मुभा असते. या सुविधेला कारागृहाच्या भाषेत ‘ॲलन कॉल’ म्हटले जाते. कैदी कोणत्या तीन नातेवाईकांशी बोलणार, हे स्थानिक पोलिसांकडून रीतसर प्रमाणित केले जाते. कैद्याला फोन दिल्यावर स्क्रीनवर केवळ तेच तीन क्रमांक दिसतात. चौथा क्रमांक डायल करताच येत नाही. या यंत्रणेत दोन ‘व्हिडिओ कॉल’ची मुभा असते. अथवा एक व्हिडिओ कॉल कमी करून प्रत्यक्ष भेटीची वेळ घेता येते. या जुन्या यंत्रणेत एक तांत्रिक दोष होता. कैद्याने घरच्यांना फोन लावल्यानंतर तिकडून नातेवाईकांनी दुसऱ्या कोणाला कॉन्फरन्सवर घेतले, तर त्यावर कारागृह प्रशासनाचे नियंत्रण राहत नव्हते. आता चार महिन्यापासून नव्या तंत्रज्ञानात ही ‘कॉन्फरन्सिंग’रची सोय पूर्णपणे बंद करण्यात आली आहे’’.

कारागृहातून मोबाईल वापर नाही
--
खासदार सोनवणे यांनी बराकींत सीसीटीव्ही कॅमेरे व मोबाईल वापराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर चांदणे म्हणाले, की बीड जिल्हा कारागृहात सुरक्षेसाठी तब्बल २०६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. यातील १२ अत्याधुनिक कॅमेरे हे एकट्या कराडच्या कोठडीसमोर लावलेले आहेत. एका कोठडीत ५० ते ५५ कैदी एकत्र राहतात. अशा स्थितीत कोणी चोरून मोबाईल वापरत असेल, तर इतर कैद्यांनी नक्कीच गदारोळ केला असता. त्यामुळे कारागृहातून कोणताही कट शिजला नाही आणि मोबाईलचा वापर झाला नाही’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT