crime
crime 
पुणे

खंडणी प्रकरणात पोलिसांसह आठ जणांवर मोक्का

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे, ता. 2 : पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिसासह आठ जणांवर खंडणी प्रकरणात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयाने संबंधित पोलिसाचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 

ब्रेकिंग - जेलमधील 10 जणांना कोरोनाची लागण...
समीर जगन्नाथ थोरात (वय 32, रा. स्वारगेट पोलिस लाईन) असे या पोलिसाचे नाव आहे. थोरात याच्या जामीनावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी होती. त्यावेळी संबंधित टोळीतील आठ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हडपसर येथील एका डॉक्टरला गर्भलिंग तपासणी करतो, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून सात लाख रुपये खंडणी उकळण्यात आली होती.

याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी आतापर्यंत जार जणांना अटक केली आहे.  त्यात पोलिस कर्मचारी समीर थोरात, तोतया पत्रकार प्रदीप फासगे, सामाजिक कार्यकर्ता कैलास ऊर्फ भागूदास अवचिते आणि आरती चव्हाण यांना अटक केली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तर या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार रंजना वणवे, सागर राऊत, महेश पवार, किरण माकर (सर्व रा. बारामती) हे फरार आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. थोरात यांच्यावतीने ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीविरुद्ध यापूर्वी एकही गुन्हा नसल्याने त्यास मोक्का कायदा लागू होत नाही. याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, असे ऍड. ठोंबरे यांनी सांगितले. सहायक पोलिस आयुक्त कल्याण विधाते पुढील तपास करत आहेत. 

गोव्यात जायचंय? तर मग ही बातमी वाचाच!
सुत्रधार महिलेवर दाखल आहेत पाच गुन्हे : 

याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले की, रंजना वणवे ही या टोळीची मुख्य सुत्रधार असून तिच्याविरुद्ध पाच गुन्हे दाखल आहेत. ती प्रत्येक वेळी गुन्हा करताना वेगवेगळ्या लोकांचा वापर करते. यापूर्वी तिला बार्शी येथे अशाच प्रकारे डॉक्टरांकडून खंडणी वसुल केल्याप्रकरणात अटक केली होती. तेथे तिच्यावर मोक्का अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. हे सर्व त्या टोळीमध्ये सहभागी असल्याने त्यांच्याविरुद्ध देखील मोक्का नुसार कारवाई केली. अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांनी मोक्का कारवाईला बुधावरी (ता.1) मंजुरी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Baramati lok sabha: मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Latest Marathi News Live Update: 'पन्नू हत्येप्रकरणी भारताच्या तपास अहवालाची वाट पाहतोय': अमेरिका

SCROLL FOR NEXT