crime
crime 
पुणे

खंडणीप्रकरणी आठ जणांवर "मोक्का'; पोलिसाचाही समावेश; जामीन अर्ज फेटाळला 

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहर पोलिस दलातील एका पोलिसासह आठ जणांवर खंडणीप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. न्यायालयाने संबंधित पोलिसाचा जमीन अर्ज फेटाळला आहे. 

समीर जगन्नाथ थोरात (वय 32, रा. स्वारगेट पोलिस लाइन) असे या पोलिसाचे नाव आहे. थोरात याच्या जामिनावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी संबंधित टोळीतील आठ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याचे पोलिसांनी न्यायालयास सांगितले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

हडपसर परिसरातील एक डॉक्‍टर गर्भलिंग तपासणी करतो, असे सांगून गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून सात लाख रुपये खंडणी उकळली होती. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने आतापर्यंत चार जणांना अटक केली. त्यात थोरात, तोतया पत्रकार प्रदीप फासगे, सामाजिक कार्यकर्ता कैलास ऊर्फ भानुदास अवचिते आणि आरती चव्हाण यांचा समावेश आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. 

या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार रंजना वणवे, सागर राऊत, महेश पवार, किरण माकर (सर्व रा. बारामती) हे अद्याप फरार आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याण विधाते तपास करीत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सूत्रधार महिलेवर पाच गुन्हे 
पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सांगितले की, रंजना वणवे ही या टोळीची मुख्य सूत्रधार असून तिच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत. ती प्रत्येक वेळी गुन्हा करताना वेगवेगळ्या लोकांचा वापर करते. तिने यापूर्वी बार्शी येथे अशाच प्रकारे डॉक्‍टरांकडून खंडणी वसूल केली होती. तेथेही तिच्यावर मोक्का अंतर्गत करवाई केली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT