Mock drill by Pune Police in Dagdusheth Halwai temple area on the occasion of Ganeshotsav 
पुणे

आणि दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात दाखल झाली क्विक ऍक्शन टीम

सकाळवृत्तसेवा

पुणे : वेळ सकाळी 10 वाजताची. ठिकाण श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर. अचानक पोलिसांचा मोठा फौजफाटा येतो. कडेकोट बंदोबस्तात मंदिर परिसरात पोलिसांकडुन अचानक तपासणी सुरु होते, नेहमीच्या पोलिसांपेक्षा वेगळा गणवेश परिधान केलेल्या जवान बारकाईने मंदिर पिंजुन काढतात. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे नागरीक व भाविकही गांगारुन जातात. मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टिने पुणे पोलिसांच्या शीघ्र कृती दलाने (क्युआरटी) घेतलेला हा 'मॉक ड्रिल' असल्याचे समजल्यानंतर सगळ्याचाच जीव भांडयात पडला !

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या दिमाखात होणारा हाच उत्सव यावर्षी मात्र साध्या पद्धतीने केला जाणार आहे. त्यासाठी बहुतांश मोठ्या मंडळानी पुढाकार घेतला आहे. असे असतानाही पुणे पोलिसांकडुन गणेशोत्सव सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी प्रयत्न केले जात आहे. या पार्श्वभुमीवर शहरातील पुणेकराच्या आकर्षणाचे केंद्रस्थान असणाऱ्या मानाच्या पाच गणपतीसह श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळाच्या सुरक्षिततेस पोलिसांकडुन प्राधान्य दिले जात आहे. त्यादृष्टिने रविवारी सकाळी 10 वाजता श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदीर व परिसरात अचानक शीघ्र कृती दलाचे पथक दाखल झाले. त्यांनी संपूर्ण परिसर बंद करुन प्रवेशद्वार, बाहेर पडणाऱ्या दार व मंदीराच्या अंतर्गत भागात बारकाईने तपासणी करीत सुरक्षेचा आढावा घेतला, अशी श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदीराचे पदाधिकारी महेश सूर्यवंशी यांनी दिली. 

पुण्यात गेल्या 24 तासांपासून पावसाची रिपरिप सुरूच; पुढील 3-4 दिवस पावसाची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT