Mock Test app for CET preparation  esakal
पुणे

सीईटीच्या तयारीसाठी ‘मॉक टेस्ट’ ॲप

मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा

पुणे - बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी तुम्ही जर ‘एमएचटी-सीईटी’चा अभ्यास करत असाल, तर प्रत्यक्ष परीक्षेच्या रंगीत तालमीची चिंता आता सोडा. कारण कर्वेनगर येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयाने एक अनोखे मॉक टेस्ट ॲप विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध केले आहे. ज्या द्वारे विद्यार्थी आपल्या तयारीची पडताळणी करू शकतात.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांचे प्रवेश एमएचटी-सीईटी या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून निश्चित करण्यात येतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात. इयत्ता बारावीच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थी या प्रवेशपरीक्षेसाठी विशेष परीश्रम घेतात. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष परीक्षेची तयारी व्हावी आणि त्या संबंधीची भीती जावी म्हणून मराठवाडा मित्र मंडळाच्या या अभियांत्रिकी महाविद्यालयाने हे ॲप विकसित केले आहे. या बद्दल प्राचार्य डॉ. व्ही.एन.गोहोकर सांगतात, ‘‘बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीच्या तयारीसाठी हे मॉक टेस्टचे ॲप विकसित करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे ॲप उपलब्ध करण्यात आले असून, सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा.’’ ॲपच्या निर्मितीत प्रा. अलका सावईकर व प्रा. स्वाती देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

ॲपचे वैशिष्ट्ये ः

- गुगल प्ले स्टोअरवर MMCOE_MMIT MOCK CET या नावाने उपलब्ध

- एका विद्यार्थ्याला ३० मॉक टेस्ट देता येईल

- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांचे प्रत्येकी १० प्रश्नपत्रिका

- विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुण आणि त्याची सविस्तर उत्तरे पाहता येणार.

मॉक टेस्टचे फायदे ः

- विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष परीक्षेची तयारी होते

- परीक्षेसंबंधीची भीती जाते

- अभ्यासाच्या उजळणीबरोबरच परीक्षेच्या तयारीची पडताळणी होते

- अभ्यासातील कच्चे दुवे लक्षात येतात

- अधिक चांगला सरावाची संधी उपलब्ध होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT