लोगो ः तनिष्का
.........................
साताऱ्यात उद्या मोदक कार्यशाळा
तनिष्का सभासदांसह अन्य महिलांना सहभागाची संधी
सातारा, ता. ७ : पारंपरिक मोदक कलेचे जतन करण्याबरोबरच त्यातून व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सकाळ ''तनिष्का''तर्फे बुधवारी (ता. ९) येथे मोदक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रशिक्षिका अपर्णा पेंढुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यशाळेत उकडीचे शुभ्र मोदक, आरतीचे मोदक, उकडीचे चाफा मोदक, रंगीत कमळ मोदक, प्रसादाचे मोदक, काजू मोदक, पंचखाद्य मोदक, मॅंगो मोदक, पान मोदक, चॉकलेट मोदक आदी दहाहून अधिक प्रकारचे आकर्षक मोदक शिकविण्यात येणार आहेत.
उकड करण्यापासून मोदक तयार करण्यापर्यंतच्या विविध बारकाव्यांसह प्रत्यक्ष सरावावर कार्यशाळेत भर दिला जाणार आहे. मोदक बनविण्याचे कौशल्य आत्मसात करून सहभागी महिलांना ‘मोदक आर्टिस्ट’ म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीही मार्गदर्शन मिळणार आहे.
..........
चौकट
................
नोंदणीसाठी संपर्क साधा...
कार्यशाळेसाठी तनिष्का सभासदांसाठी ५० रुपये, तर अन्य महिलांसाठी १०० रुपये शुल्क आहे. नावनोंदणीसाठी प्रियांका धायगुडे (९४२३५२८४३४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
......
.............
चौकट
.............
कधी ः बुधवारी (ता.९)
कुठे ः दैवज्ञ सांस्कृतिक भवन, समर्थ मंदिर, सातारा
केव्हा ः दुपारी १२ वाजता
......................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.