पुणे

पान १ संक्षिप्त

CD

‘ब्रिक्स’ची भूमिका
महत्त्वाची : मोदी
नवी दिल्ली : संरक्षण सहकार्य दृढ करण्यात आणि दहशतवादापासून ते सायबर हल्ल्यांपर्यंतच्या आव्हानांचा एकत्रित सामना करण्यात ‘ब्रिक्स’ गटाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. ‘ब्रिक्स’च्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठक दिल्लीत सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी ‘एक्स’वरून भूमिका मांडली. या गटाच्या आपल्या अध्यक्षपदाच्या काळात भारत दक्षिण जगाच्या प्राधान्यक्रमांना बळ देईल, अशी ग्वाही मोदी यांनी दिली.
(आणखी वृत्त पान--वर)

भारत-जपान परिषद
आता दिल्लीत
गुवाहाटी : भारत आणि जपान यांच्यातील वार्षिक द्विपक्षीय परिषद आता गुवाहाटी ऐवजी दिल्लीत होणार आहे. जपानच्या पंतप्रधान सानाए ताकाइची यांचे वेळापत्रक अत्यंत व्यग्र असल्याने हा बदल केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. ताकाइची या एक ते तीन जुलैदरम्यान भारतात येणार आहेत. पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. जपानचा ईशान्य भारताबरोबरील व्यापार वाढावा यासाठी ही परिषद गुवाहाटी येथे आयोजित केली होती. त्यासाठीची तयारीही पूर्ण झाली होती.

भारताची ११ जहाजे
होर्मुझमधून बाहेर
नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात शांततेसाठी सामंजस्य करार झाल्यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून ११ जहाजे भारतासाठी रवाना झाली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. अमेरिकेने इराणच्या तेलनिर्यातीवरील निर्बंध हटविल्याने होर्मुझमधून जहाजे बाहेर पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘‘भारताच्या दिशेने निघालेले १० जहाजे पर्शियाच्या आखातात असून आणखी दोन जहाजे तेथे दाखल झाली आहेत. तसेच, ११ जहाजे होर्मुझ पार करून भारताकडे निघाली आहेत,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले. या अकरा जहाजांपैकी तीन जहाजे तेलवाहू असून त्यामध्ये दोन लाख ८५ हजार टन कच्चे तेल आहे. तसेच, एकामध्ये एलपीजी असून काही जहाजांवर खते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

डॉक्टर मुलगा ठरला राजकीय सर्जन! वडिलांचा अनुभव, मुलाची रणनीती...; शिंदे पिता-पुत्रांच्या जोडीने ठाकरेंना दिला अनपेक्षित झटका

ZP School : ‘सकाळ’ला ऑनलाईन बातमी येताच बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्वच शाळा सकाळच्या सत्रात भरणार; शिक्षण विभागाकडून निघाले आदेश

Latest Marathi News Live Update : माऊलींच्या पालखीसाठी अवघ्या तीन महिन्यात भूसंपादन

खुशखबर! विदर्भात अखेर मॉन्सून दाखल; दहा वर्षांत दुसऱ्यांदा उशिरा आगमन, येलो अलर्ट जारी

Manmad Crime : मनमाडमध्ये पहाटे दुहेरी हत्याकांड; महामार्गालगत झोपलेल्या दोघांना दगडाने ठेचले

SCROLL FOR NEXT