पुणे

उद्योगांनी गुंतवणुकीसह नवोन्मेषासाठी पुढे यावे पंतप्रधान मोदी ः अर्थसंकल्पात विकसित भारताचा कृती आराखडा

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २७ ः- ‘‘सरकार, उद्योग आणि ज्ञान भागीदार एकत्र येऊन पुढे जातात, तेव्हा सुधारणांचे परिणाम दिसतात आणि कागदावरील घोषणांचे प्रत्यक्षात यशात रुपांतर होते. त्यामुळे भारतीय उद्योगांनी नव्या गुंतवणुकीसह नवोन्मेषासाठी पुढे यावे आणि वित्तीय संस्थांनी व्यवहार्य उपाय आखून बाजारातील विश्वास वाढवावा,’’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.
विकसित भारतासाठी तंत्रज्ञान, सुधारणा आणि वित्त’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर परिसंवादात ते बोलत होते. या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात तंत्रज्ञान, सुधारणा आणि अर्थ यांच्या साहाय्याने विकसित भारताचा कृती आराखडा मांडण्यात आला असल्याचे सांगत उद्योगजगताला गुंतवणूक आणि नवकल्पनांसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन मोदींनी केले. तसेच वित्तीय संस्थांनी व्यवहार्य उपाययोजनांच्या माध्यमातून उद्योगांना मदत करून बाजारातील विश्वास दृढ करावा, अशा सूचनाही दिल्या.
मोदी म्हणाले, ‘‘गेल्या दशकात सरकारने पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले आहे. महामार्ग, रेल्वे, बंदरे, डिजिटल नेटवर्क आणि वीज प्रणाली यांसारख्या ठोस मालमत्ता निर्माण करूनच भारताचा विकास साध्य होईल, असा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. येत्या अनेक दशकांपर्यंत या मालमत्ता उत्पादकता निर्माण करत राहतील. यासाठी सार्वजनिक भांडवली खर्चात सातत्याने वाढ केली जात आहे.’’ सार्वजनिक भांडवली खर्च ११ वर्षांपूर्वी सुमारे दोन लाख कोटी रुपयांचा होता. तो आता केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये बारा लाख कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. भांडवली खर्चातील ही मोठी तरतूद खासगी क्षेत्रासाठी नव्या जोमाने पुढे येण्याचा स्पष्ट संदेश असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगांनी अर्थसंकल्प २०२६-२७ मधील सर्व घोषणांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मागील दशकात भारताने दाखवलेली विलक्षण लवचिकता ही योगायोगाने घडलेली नसून, ठाम विश्वासावर आधारित सुधारणा धोरणांमुळे शक्य झाल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. सरकार, उद्योग, वित्तीय संस्था आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यात सहकार्य साधणारा ‘सुधारणा भागीदारी जाहीरनामा’ तयार करण्याचा सल्ला देत पंतप्रधानांनी सांगितले की, २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी हा दस्तऐवज अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

राष्ट्रीय अर्थसंकल्प हा अल्पकालीन व्यवहाराचा दस्तऐवज नसून, तो धोरणात्मक दिशादर्शक आराखडा आहे. त्यामुळे त्याची परिणामकारकता ठोस आणि आशयपूर्ण निकषांवरच तपासली पाहिजे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

Rashmika wedding: ना पुरोहित , ना अग्नि; तरीही पवित्र! जाणून घ्या रश्मिका–विजयच्या कोडावा पद्धतीतील विवाहसोहळ्यामागील अनोख्या परंपरा

Silver Buying Tips : ऑनलाइन सिल्वर ज्वेलरी खरेदी करताय? मग बनावट चांदीपासून राहा सावध, आत्ताच पाहा फेक ओळखायच्या 'या' 5 ट्रिक्स

Akola News : स्मार्ट मीटरचा पातूर पोलीस स्टेशनला दणका; चार महिन्यांचे ५२ हजार रुपये बिल थकीत, वीजपुरवठा खंडित

Crime: भयंकर! क्षुल्लक वाद विकोपाला गेला; २१ वर्षीय तरूणाने १२ वर्षीय भावाला संपवलं, अमरावतीत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT