पुणे

‘मोदी सरकारकडूनच जातिनिहायगणनेमध्ये अडथळा’

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १८ ः जातिनिहाय जनगणनेमध्ये मोदी सरकारच जाणीवपूर्वक अडथळा आणत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
केंद्र सरकारनेच २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयात जात नोंदणीसाठी ‘ड्रॉप-डाउन मेन्यू’ची शिफारस केली होती. मात्र, २०२७ च्या जनगणनेत अशा संरचित पद्धतीचा समावेश का करण्यात आलेला नाही, असा सवाल काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज विचारला. त्‍यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये २१ सप्टेंबर २०२१ रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा संदर्भ दिला आहे. या प्रतिज्ञापत्रात जात जनगणनेची मागणी फेटाळण्यात आली होती. मात्र, त्याच प्रतिज्ञापत्रातील परिच्छेद १२ (डी) मध्ये २०११ च्या जनगणनेपूर्वी जातींची कोणतीही नोंदणी तयार करण्यात आली नव्हती आणि जातींच्या नोंदणीसाठी ‘ड्रॉप-डाउन मेन्यू’ची सुविधा असती तर अधिक सुसंगत व विश्वासार्ह माहिती मिळाली असती असे नमूद केले असल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला.
बिहार आणि तेलंगण या दोन्ही राज्यांच्या जात सर्वेक्षणांमध्ये अशा प्रकारच्या संरचित ‘ड्रॉप-डाउन मेन्यू’चा वापर करण्यात आला होता, याकडे लक्ष वेधत केंद्र सरकारने २०२७ च्या जनगणनेत अशा पद्धतीचा अवलंब का केलेला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

Swami Ramanand Teerth Marathwada University Promotions: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती

SCROLL FOR NEXT