पुणे

‘महिला सुरक्षेचे सरकारचे दावे फोल’

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ८ : मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कारभारात कायदा-सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेबाबत करण्यात आलेले दावे पूर्णपणे फोल ठरल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीचा दाखला देत त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ते म्हणाले, ‘‘देशातील महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये २०१३ नंतर ४२.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच बालकांविरोधातील गुन्ह्यांमध्ये तब्बल २०४.६ टक्क्यांची वाढ झाली. अनुसूचित जातींवरील अत्याचार ४१.३ टक्क्यांनी, तर आदिवासींवरील गुन्हे ४६.७ टक्क्यांनी वाढले आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये एक हजार ६८९ टक्क्यांची प्रचंड वाढ झाल्याचा उल्लेख करताना खर्गे यांनी डिजिटल सुरक्षेबाबतही सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशात गुन्हेगारी वाढत असताना सरकार केवळ प्रचारात व्यग्र आहे, अशी टीकाही केली.

शेतकरी, मजूर आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या मुद्द्यावरूनही खर्गे यांनी सरकारला धारेवर धरले. देशातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती गंभीर होत असून केंद्र सरकारने केवळ घोषणांऐवजी प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG संकटावर अखेर पडदा! सरकारने हटवले सर्व निर्बंध; 'या' क्षेत्रांना मिळाला मोठा दिलासा

Monsoon Rain : मॉन्सूनचा वेग मंदावला, सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट; राज्यात हवामान अंदाज कसा असेल

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...! डोळ्यांसमोर कोसळली घरे़; रात्रभर नागरिक रस्त्यांवर

Ketan Agarwal Murder Case : ... तर तिलाही त्याच किल्ल्यावरुन ढकलून द्या, सियाच्या वडिलांची धक्कादायक मागणी

MPSC Mega Bharti: ‘एमपीएससी’कडून २,६१९ पदांसाठी मेगाभरती; गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २७ जून ते १७ जुलै करा ऑनलाइन अर्ज..

SCROLL FOR NEXT