हेड
जहाजे, खलाशांना
संरक्षण मिळावे
सबहेड
इराणच्या अध्यक्षांकडे मोदींची अपेक्षा
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.११ : युद्धग्रस्त इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील तणावाबाबत सविस्तर चर्चा केली. सर्व प्रश्नांवर संवादातून तोडगा काढण्यावर भर देताना मोदींनी समुद्रात जहाजांचा विनाअडथळा संचार आणि खलाशांची सुरक्षा यावर भर दिला. ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची झालेली ही मागील पंधरा दिवसांतील दुसरी भेट आहे. तत्पूर्वी ३१ ऑगस्ट रोजी बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान त्यांची भेट झाली होती. ‘ब्रिक्स’शी संबंधित बैठकांमध्ये इराणचा नियमित आणि उच्चस्तरीय सहभाग असल्याबद्दल मोदी यांनी पेझेश्कियान यांचे आभार मानले. तसेच ‘ब्रिक्स’च्या व्यासपीठावरून दक्षिणेतील देशांमध्ये सहकार्य, नवकल्पना आणि शाश्वत विकासाला चालना देण्याची क्षमता असल्याचे मोदी यांनी नमूद केले. बैठकीत पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवरही सविस्तर चर्चा झाली. या भागातील प्रश्न संवाद आणि राजनैतिक मार्गाने सोडविण्याची भारताची भूमिका मोदी यांनी पुन्हा स्पष्ट केली. पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सागरी वाहतूक मार्ग सुरक्षित राहणे गरजेचे असून खलाशांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मोदींनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.