पुणे

आग विझवणारी चिमणी आलीच नाही

CD

MOD26A03185, MOD26A03186
मोडनिंब (ता. माढा) : येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेली कोवळी वृक्षसंपदा. (दुसऱ्या छायाचित्रात) जुन्या मोठ्या वृक्षांनाही या आगीची झळ सोसावी लागली.
---
मोडनिंब शहरातील हरितसंपदेवर वणव्याचा घाला
विद्युत तारा तुटून ठिणगी; शासकीय दुर्लक्षामुळे चार वर्षांची वृक्षसंपदा राख
सकाळ वृत्तसेवा
मोडनिंब, ता. २८ : माढा तालुक्यातील मोडनिंब शहराच्या मध्यवर्ती भागातील सामाजिक वनीकरणातून उभारलेली मौल्यवान वृक्षसंपदा सोमवारी (ता. २७) भीषण आगीत होरपळून गेली. विद्युत वाहिनीच्या तारा तुटून पडलेल्या ठिणगीमुळे लागलेल्या आगीत सुमारे तीन हजार कोवळी झाडे राख झाली. चार वर्षांची वाढ झालेल्या या झाडांसह कडुनिंबाची काही मोठी झाडेदेखील आगीत जळून खाक झाली.
जून २०२२ मध्ये सामाजिक वनीकरण विभागाने मोडनिंब येथील सीना-माढा उपसा सिंचन योजनेअंतर्गत पाच हेक्टर क्षेत्रात ५ हजार ५५५ झाडांची लागवड केली होती. कडुनिंब, करंज, आवळा, वावळा, चिकू, चिवण आदी देशी वृक्षांचा यात समावेश होता. सामाजिक वनीकरण विभागाने तीन वर्षे या वृक्षांची योग्य निगा राखली होती. मात्र, जून २०२५ मध्ये या वृक्षसंपदेचे हस्तांतरण सीना-माढा उपविभागाच्या सहायक अभियंत्यांकडे झाल्यानंतर परिस्थिती बदलली. गेल्या वर्षभरात या झाडांकडे दुर्लक्ष झाले. परिसरातील वाढलेले वाळलेले गवत काढण्यात आले नाही. उन्हाळ्यात वाढत्या तापमानात झाडांना पाणीही देण्यात आले नाही. परिणामी, वाळलेल्या गवतामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली.
तीन शासकीय कार्यालयांच्या शेजारी असलेल्या या वृक्षसंपदेचा असा दुर्दैवी अंत झाल्याने नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय दुर्लक्ष आणि देखभालीअभावी लाखमोलाची ही हरितसंपदा एका आगीत भस्मसात झाली.
---
चाैकट
‘प्राणवायू फॅक्टरी’ राखेत परावर्तित
सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास लागलेली आग बराच वेळ धगधगत राहिली. आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नाही. शहराच्या मध्यभागी उभी राहात असलेली ही ‘प्राणवायू फॅक्टरी’ अक्षरशः राखेत परिवर्तित झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Success Story : नोकरी न सोडता पगाराव्यतिरिक्त तरुणीने केली ६३ लाखांची कमाई! उत्पन्नाचे सांगितले 'हे' ६ स्त्रोत, व्हायरल होतोय व्हिडिओ

Thalapathy Vijay Divorce Case : मुख्यमंत्री विजय थलपती यांचे विवाहबाह्य संबंध? घटस्फोट प्रकरणातील सुनावणीबाबत मोठी अपडेट समोर; दोघांनाही कोर्टात राहण्याचे आदेश

Online Scam : मुंबईची घटना! मोबाईल गरम होताच बँक अकाऊंटमधले 70 हजार गायब, फ्रॉड नेमका काय? सुरक्षित कसं राहायचं पाहा

Latest Marathi News Live Update : CSMT मेट्रोत वारणा मिल्क सेंटरचा भव्य शुभारंभ! फडणवीसांचा मोठा संदेश

India A Squad Change: भारतीय संघात सलग दोन पराभवांनंतर अचानक बदल; 150 KPH वेगानं गोलंदाजी टाकणाऱ्या खेळाडूची निवड

SCROLL FOR NEXT