दिल्ली - जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांना चकाचक शाळा पाहून तेथील मुलांसमवेत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.
दिल्ली - जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांना चकाचक शाळा पाहून तेथील मुलांसमवेत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही.  
पुणे

मोहल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर उपकेंद्रे हवीत

सकाळवृत्तसेवा

बारामती - ‘दिल्लीतील मोहल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर आपल्याकडील उपकेंद्रे व्हायला हवीत. आरोग्य खात्यातील रिक्त पदे तातडीने भरली गेली पाहिजेत. उपकेंद्रे सक्षम केली तर वाड्यावस्त्यांवर चांगले उपचार 
मिळू शकतात,’’ असे मत जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी व्यक्त केले. 

जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून रोहित पवार हे गरजू रुग्णांना उपचाराच्या तपासणी खर्चापासून ते शस्त्रक्रियेपर्यंत मदत करीत आहेत. त्याचबरोबर अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करीत आहेत. अनंत आरोग्य व सृजन आरोग्य अभियान ते चालवीत आहेत. आरोग्याबरोबर शिक्षणाच्या व्यवस्थेत अधिक गतिमानता यावी, यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण, अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण, शाळा डिजिटायझेशन यावरही त्यांचा भर आहे. तालुक्‍यात केलेल्या या कामादरम्यान त्यांना दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेत झालेल्या बदलाची व सार्वजनिक आरोग्यासाठी तेथील सरकारने केलेल्या कार्यवाहीची माहिती मिळाली. त्यामुळे ते अभ्यासासाठी दिल्ली येथे गेले होते. त्यांनी दिल्ली सरकारने शिक्षणव्यवस्थेत केलेले बदल व मोहल्ला क्‍लिनिकच्या व्यवस्थेसंदर्भात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याशी चर्चा केली. शाळा व मोहल्ला दवाखान्यांना भेटी देऊन माहिती घेतली. 

रोहित पवार म्हणाले, ‘‘आपल्याकडे सरकारी प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था आधीपासूनच आहे. शिवाय रयत शिक्षण संस्था व जिल्हा शिक्षण मंडळासारख्या मातब्बर संस्था आहेत. त्यामुळे येथे तसा प्रश्‍न नाही. फक्त उच्च शिक्षणासाठी अशा प्रकारची मोफत ताकद तालुक्‍याच्या ठिकाणी मुलांना मिळाली, तर सर्वसामान्य कुटुंबांचा शिक्षणावरचा खर्च कमी होईल. मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल.’’

दिल्लीतील ५५ टक्के मुले सरकारी शाळेत शिकतात. तेथील सरकारने या मुलांना सरकारी शिक्षण अधिक चांगले वाटले पाहिजे, यासाठी जलतरण तलावापासून वातानुकूलित वर्गखोल्या आणि भव्य इमारतीपर्यंत सर्व सुविधा दिल्या आहेत. तेथे फक्त प्रशिक्षणासाठी ११० कोटींची तरतूद केली आहे. 
 - रोहित पवार, जिल्हा परिषद सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

बापरे! बॉल समजून पकडला बॉम्ब ... 13 वर्षीय मुलाचा स्फोटात मृत्यू , नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT