पुणे

महिला क्रिकेट स्पर्धा २

CD

फोटो ः मोहिनी कुलकर्णी

मोहिनी कुलकर्णीची अर्धशतकी खेळी

पुणे, ता. २६ ः इकोल स्पोर्ट्‌स फाउंडेशन आयोजित ‘इकोल रिक्रीएशन एक्सलन्स करंडक‌’ एकोणीस वर्षांखालील महिला गट साखळी क्रिकेट स्पर्धेत मोहिनी कुलकर्णीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर लेडी लेजंड संघाने फिनिक्स वूमन संघाचा नऊ धावांनी पराभव केला.
वाघोली येथील राजगड स्पोर्ट्‌स क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना लेडी लेजंड संघाने सात बाद १८० धावा केल्या. या वेळी मोहिनी कुलकर्णीने नऊ चौकारांसह ५३ धावांची खेळी केली. तिला स्वरा आव्हाळेने सुरेख साथ दिली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ६९ चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. प्रेरणा देशमुखने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तर देताना फिनिक्स वूमन संघाला ८ बाद १७१ धावा करता आल्या. या वेळी प्रेरणा देशमुख, शांभवी इंगळेने केलेली खेळी अपुरी पडली. ‘सामन्याचा मानकरी’ हा मान मोहिनी कुलकर्णीने पटकाविला. संक्षिप्त धावफलक ः
लेडी लेजंड संघ - (३० षटकांत) ७ बाद १८० मोहिनी कुलकर्णी ५३, स्वरा आव्हाळे २१, प्रेरणा देशमुख २-१९) विजयी विरुद्ध फिनिक्स वूमन संघ - (३० षटकांत) ८ बाद १७१ (प्रेरणा देशमुख ३४, शांभवी इंगळे ३१, परीनाझ दुभाष २४, स्वाती काळभोर २-२२, गौरी तापकीर २-२४).
----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT