WDL26B02885
वडाळा (ता. उ. सोलापूर) : मोहितेवाडी पंपगृहाची पाहणी करताना आमदार सुभाष देशमुख, जि.प.चे माजी अध्यक्ष बळिराम साठे आदी.
---
आ. सुभाष देशमुखांकडून
मोहितेवाडी पंपगृहाची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
वडाळा, ता. ७ : उत्तर सोलापूर तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून, सध्या शिरापूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळिराम साठे यांनी मोहितेवाडी येथील टप्पा क्रमांक २ च्या पंपगृहाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या कामाची माहिती कार्यकारी अभियंता मकरंद म्याकाल यांनी दिली. आमदार सुभाष देशमुख यांनी शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या डाव्या कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच तालुक्यातील विविध तलावांमध्ये पाणी सोडण्यासाठी आवश्यक यंत्रणा तयार करून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यासाठी निधी देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची मागणी वाढली असल्याने रानमसले, वडाळा, नान्नज, कळमण व कौठाळी परिसरातील तलाव भरून पाणी सोडण्याच्या सूचना उपसा सिंचन उपविभाग क्रमांक १६ चे अभियंता सुभाष देवकते यांना त्यांनी दिल्या.
यावेळी माजी सभापती संभाजी भडकुंबे, माजी उपसभापती जितेंद्र शीलवंत, मनोज साठे, दीपक अंधारे, नंदकुमार गवळी, शहाजी गोफणे, रानमसलेचे सरपंच मनोज क्षीरसागर, उपसरपंच रमेश सुतार, भैरवनाथ हावळे, अकोलेकटीचे उपसरपंच सर्जेराव पाटील, विशाल जाधव, मार्डीचे बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.