MOH26B03679
मोहोळ : दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देताना भाजपचे कार्यकर्ते.
---
मोहोळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
भाजपचे निवेदन; अल्प पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. १५ : तालुक्यात चालू वर्षी पावसाचे अत्यल्प व अनियमित प्रमाण राहिल्याने गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोहोळ तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी सिनेट सदस्य तथा भाजपचे युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली.
पावसाअभावी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकांची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी पिके वाळून गेली आहेत. विहिरी, तलाव, बंधारे व अन्य जलस्रोतांतील पाणीसाठा कमी झाल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, पशुपालक व ग्रामीण जनतेसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.
तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात, पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई व पीकविमा मिळवून द्यावा, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावेत, जनावरांसाठी चारा व छावण्यांची व्यवस्था करावी, तसेच मनरेगा व रोजगार हमी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशीही विनंती निवेदनात करण्यात आली.
यावेळी प्रकाश चवरे, सतीश काळे, रमेश माने, पिंटू राऊत यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, संस्थांचे पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.