पुणे

NIC सर्व्हर असल्याने मोहोळ तालुक्यातील धान्य वाटप खोळंबले

CD

सर्व्हर बंद; मोहोळमध्ये धान्य वाटप खोळंबले
ई-केवायसीचीही अडचण; दुकानदार, शिधापत्रिकाधारक त्रस्त

सकाळ वृत्तसेवा
नजीक पिंपरी, ता. १० ः तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांतील शासनाचे एनआयसी सर्व्हर तीन दिवसांपासून बंद असल्याने धान्य वाटप खोळंबले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. दुकानदार आणि ग्राहकांमध्ये तक्रारी वाढल्या आहेत. सर्व्हरअभावी धान्य वाटप करता येत नसल्याने दुकानदारांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

शासनाच्या नव्या नियमानुसार धान्याची उचल करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, ई-केवायसी करतानाही मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे वृद्ध तसेच लहान मुलांना घेऊन शिधापत्रिकाधारकांना वारंवार धान्य दुकानात यावे लागत आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या महिन्यापासून तीन महिन्यांचे आगाऊ धान्य देण्यात येणार आहे. त्यानुसार मोहोळ तालुक्यात आगाऊ धान्य वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून एनआयसी सर्व्हर बंद असल्याने धान्य वाटपात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुकानदारांनी सध्याचे धान्य वाटप करावे की पुढील महिन्याचे धान्य साठविण्यासाठी जागा
उपलब्ध करून घ्यावी, याबाबतही अडचण निर्माण झाली आहे.

कोट
- ज्यष्‍ठ आणि लहान मुलांना दररोज धान्य दुकानात घेऊन यावे लागत असल्याने मोठी अडचण होत आहे. ई-केवायसीची प्रक्रिया सुलभ करावी,
- संतोष खरात, सय्यद वरवडे

कोट
- शासनाच्या नियोजनानुसार तालुक्यात आगाऊ धान्य वाटप सुरू झाले आहे. मात्र, सर्व्हर बंद असल्याने वाटपात अडचणी येत आहेत.
- नटूरे, पुरवठा निरीक्षक

कोट
- एनआयसी सर्व्हर बंद असल्यामुळे धान्य वाटप खोळंबले आहे. पुढील महिन्याचे धान्य साठविण्यासाठी दुकानदारांकडे जागेचीही समस्या निर्माण होऊ शकते, काकडे, धान्य दुकानदार बेगमपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gen-Zचा जलवा, पहिल्यांदाच ‘वंदे मातरम्’चा जयघोष अन्... यंदा लाल किल्ल्यावर मोठे बदल दिसणार; ८०व्या स्वातंत्र्यदिनी काय खास होणार?

SHRAVAN 2026 : “श्रावणात भोलेनाथांची विशेष कृपा! ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार मोठा चमत्कार”

कसा झालेला 'अशी ही बनवाबनवी' मधल्या शंतनूचा मृत्यू? पत्नीने सांगितलं त्या दिवशी काय घडलं; आम्ही चौघेही...

Pavitra Portal Deadline Extended: पवित्र पोर्टलवरील प्राधान्यक्रम नोंदणीला मुदतवाढ; तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना दिलासा

शुभमन गिलपेक्षाही मोठी बोली लागलेला कोण आहे Sanvir Singh? T20 स्पर्धेत भारतीय कर्णधारासह खेळणार

SCROLL FOR NEXT