पुणे

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोहोळ येथे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

CD

MOH26B03195
मोहोळ ः येथे मतदान यंत्राची हाताळणी करताना मतदान अधिकारी.

मोहोळमध्ये मतदान अधिकाऱ्यांना यंत्र हाताळणी प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. २४ ः मोहोळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कामी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकारी यांचे प्रथम प्रशिक्षण घाटोळे मंगल कार्यालय येथे शुक्रवारी (ता. २३) सकाळी ९ ते ११ मौखिक प्रशिक्षण व मतदान यंत्र हाताळणी प्रशिक्षण दुपारी १२ ते १.३० या वेळेत आयोजित करण्यात आले होते. अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर धाईजे यांनी मौखिक प्रशिक्षणात उपस्थित निवडणूक कर्मचाऱ्यांना माहिती दिली. एकूण १४०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर धाईंजे व प्रशिक्षक महेश कोटीवाले यांनी प्रशिक्षण देताना ‘निवडणूक साहित्य ताब्यात घेणे, मतदान पूर्व तयारी, प्रत्यक्ष मतदान सुरू करण्यापूर्वी, सुरू असताना, मतदान संपल्यानंतर करावयाच्या कार्यासंबंधी मार्गदर्शन करताना मतदार यादी, मतदान यंत्रे, साहित्य तपासून घेणे, मतदारांच्या बोटाला शाई कशी लावावी, प्रदत्त मतदान, दुबार मते इत्यादी विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. धाईंजे यांनी सांगितले, जिल्हा परिषदेसाठी पांढऱ्या रंगाची तर पंचायत समिती साठी गुलाबी रंगाची मतपत्रिका निश्चित करण्यात आली आहे. या प्रशिक्षणास मतदान केंद्राध्यक्ष ३३८, सहायक मतदान केंद्राध्यक्ष ३३६, मतदान अधिकारी क्रमांक एक ३३०, मतदान अधिकारी क्रमांक चार ४०६ असे मतदान केंद्रावरील सर्व नियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी मोहोळ तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेतील मनुष्यबळ पुरवठा शाखा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणामध्ये संबंधित मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना मौखिक प्रशिक्षण व ईव्हीएम हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक, मनुष्यबळ पुरवठा पथकाचे प्रमुख अनिल शहापुरे नायब तहसीलदार, पथक सहायक प्रकाश दळवे, मंडलाधिकारी सावळेश्वर, सागर पाटील सहायक, प्रवीण जगताप, महसूल सहायक इत्यादी कर्मचारी यांनी प्रशिक्षणाची पूर्वतयारी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणानंतर दुसरे प्रशिक्षण ३० जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT