पुणे

बारामती शहरातील २५ जणांवर ‘मोका’

सकाळवृत्तसेवा

बारामती शहर - येथील मटका व्यावसायिक कृष्णा महादेव जाधव खून प्रकरणातील २१ संशयितांविरुद्ध, तर इतर प्रकरणांतील चार अशा एकूण २५ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाईस विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मान्यता दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी ही माहिती दिली. 

या वेळी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, धन्यकुमार गोडसे व विठ्ठल दबडे उपस्थित होते. येथील मटका व्यावसायिक कृष्णा जाधव याचा नुकताच बारामतीत खून करण्यात आला होता. या प्रकरणात जाधव याची पत्नी सपना जाधव यांच्या फिर्यादीवरून २१ जणांवर गुन्हा दाखल केला. यात चार अल्पवयीन संशयितांचाही समावेश आहे. यापैकी काही जणांवर यापूर्वीच ३६ गुन्हे दाखल आहेत. 

दिनेश रावसाहेब ऊर्फ पांडुरंग वायसे, विनोद शिवाजी माने, गणेश विठ्ठल माने, अनिल संभाजी माने, सुनील संभाजी माने, प्रेम दिनेश वायसे, अविनाश ऊर्फ अवी प्रदीप जाधव, संदीप दत्तू माने, रवी ऊर्फ रवींद्र एकनाथ माकर, मोठा बिट्या ऊर्फ सचिन रमेश जाधव, लोकेश परशुराम ऊर्फ दत्तात्रेय माने, गुलाब उत्तम माने, कुंदन ऊर्फ बाळा दत्तात्रेय जाधव, सागर सुभाष शेळके, अविनाश ऊर्फ साड्या हनुमंत साडेकर, महेश विठ्ठल माने, अक्षय संजय भोसले (सर्व रा. बारामती) यांच्यासह चार अल्पवयीन मुलांवर मोकाअंतर्गत कारवाईस मान्यता मिळाली आहे. तसेच धन्या ऊर्फ योगेश गोकूळ कांबळे, रोहित दादा जगताप, सचिन ऊर्फ बाज्या राजेंद्र काळे व एक अनोळखी अशा चार जणांवरही मोकाअंतर्गत कारवाई होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT