Pune Crime esakal
पुणे

Pune Crime: राजन लावंडसह टोळीतील पाचजणांवर मोक्का

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची गुन्हेगारांविरुध्द धडक कारवाई

सकाळ डिजिटल टीम

Pune Crime- शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत धडक कारवाई सुरू केली आहे.

हडपसर परिसरात अपहरण, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत] विनयभंग असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या राजन लावंड टोळीतील पाच जणांविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी केलेली मोकाची २२ वी कारवाई आहे.

टोळीप्रमुख राजन रघुनाथ लावंड (वय २१), ओम ऊर्फ पिंटू विनोद भंडारी (वय २२), ऋषिकेश ऊर्फ मेघराज प्रवीण शितोळे (वय १९), रोशन हनुमंत सोनकांबळे (वय २१) आणि सागर शिवाजी घायतडक (वय १९, सर्वजण रा. माळवाडी, हडपसर) यांच्याविरुध्द मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. (Marathi Tajya Batmya)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत घायतडक याच्या खुनाचा राग मनात धरून राजन लावंड आणि त्याच्या साथीदारांनी एकाला मारहाण केली होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी राजन लावंड टोळीतील पाच जणांना अटक केली होती. दरम्यान, परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी टोळीप्रमुख राजन लावंड याला दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. परंतु त्याने वारंवार गंभीर गुन्हे केल्याचे पोलिस तपासात समोर आले. (Latest Marathi News)

हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी पोलिस उपायुक्त यांच्यामार्फत या लावंड टोळीविरुद्ध मोकाचा प्रस्ताव पाठविला होता. अतिरिक्त आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी मोकाच्या कारवाईस मान्यता दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT