पुणे

मोळाचा ओढा परिसरात वाहतुक नियमन

CD

मोळाचा ओढा परिसरात वाहनांवर कारवाई

सातारा, ता. ३० : सातारा शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या मोळाचा ओढा परिसरातील बेशिस्‍त वाहतुकीला तसेच अस्‍ताव्‍यस्‍त वाहनांवर कारवाई करण्‍यासाठी सातारा तालुका पोलिसांच्‍या वतीने पथक तैनात करण्‍यात आले आहे. पथकाने ४० हून अधिक वाहनांवर कारवाई करत दंड वसूल केला.
मोळाचा ओढा चौकातून दररोज हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. याचठिकाणी बांधकाम व्‍यवसायाशी निगडित साहित्‍य विक्रीची दुकानेही असून, याठिकाणी माल नेण्‍या-आणण्‍यासाठीची मोठी वाहने आलेली असतात. ही वाहने रस्‍त्‍याकडेला कोणत्‍याही सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी न करता उभी केलेली असतात. यामुळे तसेच बेशिस्‍त वाहनधारकांमुळे याठिकाणी अपघाताचा मोठा धोका दररोज निर्माण होत असतो. हा धोका टाळण्‍यासाठी सातारा तालुका पोलिसांच्‍या वतीने मोळाचा ओढा चौकात कर्मचारी नेमण्‍यास सुरुवात करण्‍यात आली आहे.
या पथकाने बेशिस्‍त वाहनचालक, वाहतूक नियमांचे उल्‍लंघन करणारे चालक, काळ्या फिल्‍मिंग असणारी वाहने तसेच इतरांवर लक्ष केंद्रित केले आहे. या पथकाने नुकतीच सुमारे ४० हून अधिक वाहनांवर दंडात्‍मक कारवाई केली. या कारवाईचे सर्वच स्‍तरातून कौतुक होत आहे. याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नेमल्‍यास वाहतुकीचे नियमन योग्‍य प्रकारे होईल, असे या परिसरातील नागरिकांचे, व्‍यापाऱ्यांचे मत आहे. मोळाचा ओढा परिसरातील वाहतुकीस शिस्‍त लागावी, तसेच नागरिक, वाहनचालकांच्‍या सुरक्षेला प्राधान्‍य देत या परिसरावर सातारा तालुका पोलिसांकडून जास्‍तीचे लक्ष देण्‍यात येणार असल्‍याची माहिती सातारा तालुका पोलिस ठाण्‍याचे निरीक्षक नीलेश तांबे यांनी या कारवाईच्‍या निमित्ताने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवापूर्वी पुणे पोलिसांचा मोठा आदेश; १४ दिवस कलम ३७ लागू, पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावावर बंदी

खिशात फक्त 20 पैसे, तीन दिवस उपाशी… जावेद अख्तरांनी सांगितला मुंबईतील संघर्षाचा काळ, म्हणाले...

Vaibhav Sooryavanshi: दुलीप ट्रॉफीत अचानक बदललं चित्र! इशान किशनला नेमकं काय झालं? १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीकडे आली कर्णधारपदाची धुरा

Nepal Flood : नेपाळच्या महापुरादरम्यान थरारक घटना ! एका साडीने वाचवला २१ जणांचा जीव; चेन्नईतील भाविकांनी सांगितली आपबीती

Vastu Tips: जुन्या कपड्यांनी फरशी पुसणे योग्य की अयोग्य? 'या' चुकीमुळे वाढू शकते आर्थिक टंचाई! वास्तूनुसार जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT