पुणे

मंचर परिसरात ४१ मिमी पावसाची नोंद

CD

मंचर, ता. २३ : गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मंचर शहर व परिसराला मंगळवारी (ता. २३) पावसाने दिलासा दिला. दिवसभरात तीन वेळा झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, रात्री साडेआठपर्यंत ४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
मंगळवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी व संध्याकाळी पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. रात्री साडेसात ते रात्री आठच्या सुमारास झालेल्या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते, तर काही ठिकाणी पाणी वाहत असल्याचे चित्र दिसून आले. मंचरसह पिंपळगाव, अवसरी खुर्द, आदर्श गाव गावडेवाडी, चांडोली खुर्द, सुलतानपूर, श्रीक्षेत्र वडगाव काशिंबे, एकलहरे, तांबडे मळा, शेवाळवाडी आणि भोरवाडी परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येण्यासाठी तसेच सध्या शेतात असलेल्या भाजीपाला, तरकारी पिके आणि जनावरांच्या चाऱ्यासाठी लागवड केलेल्या गवताला या पावसाचा मोठा फायदा होणार असल्याचे अवसरी खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद कराळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 TRADE: नवा कोच, नवा प्लान! हार्दिक पांड्याच्या ट्रेडवरून CSK चं विधान; ऋतुराज, MS Dhoni यांच्याशी चर्चा, नेमकं काय शिजतंय?

Gold Rate Today: सोन्याच्या दरात भडका! 7 दिवसांत 11 हजारांनी महाग; आज तर तब्बल... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती?

Marathi News Live Updates: कंगना रणौत यांचा राहुल गांधींवर आरोप; संसद चालू न देण्याचा विरोधकांवर ठपका

“त्यांनी मला जोरात मारलं अन् मी रडू लागले”; नाना पाटेकरांनी अभिनेत्रीला मारलेली कानशि‍लात

Abhijit Dipke Protest: दीपकेंविरोधात उपोषण करणाऱ्या दोघांचीही प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल करताच...

SCROLL FOR NEXT