money 
पुणे

Loksabha 2019 : पुणे : दौंड तालुक्यात पैसे वाटपाचा धक्कादायक प्रकार

सकाळवृत्तसेवा

दौंड : लिंगाळी (ता. दौंड) येथे आज मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार घडला. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला या प्रकाराची माहिती मिळाली होती; परंतु पथक पोचण्यापूर्वी पैसे वाटणारे पसार झाले होते. दरम्यान, पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

लिंगाळी येथील पासलकर वस्ती येथील मतदान केंद्राजवळ हा प्रकार सुरू होता. वंचित बहुजन आघाडीच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत संबंधितांना जाब विचारताच पैसेवाटप थांबवून त्यांनी काढता पाय घेतला. याची माहिती मिळताच भरारी पथक तेथे दाखल झाले; परंतु त्यांना पैसे वाटणारे आढळून आले नाहीत, असे दौंडचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले. 

तहसीलदार बालाजी सोमवंशी म्हणाले, "याप्रकरणी कोणाचीही लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास आणि पैसेवाटप होत असल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई केली जाईल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT