Money-Lender
Money-Lender 
पुणे

वसुलीसाठी विष पाजले, दागिने मोडावे लागले

सकाळवृत्तसेवा

सासवड - बेकायदा सावकारीविरुद्ध सासवड पोलिसांनी विशेष अभियान सुरू केले असून, स्वतंत्र कक्ष उघडला आहे. त्यात अल्पावधीतच पिळवणुकीची तीन प्रकरणे उजेडात आली असून, गुन्हेही दाखल झाले आहेत. व्याज वसुलीसाठी संबंधितांना विष पाजून मारण्याचा प्रयत्न करणे, माता-भगिनींच्या गळ्यातील दागिने गहाण ठेवणे, जमिनीचे कुलमुखत्यारपत्र करून घेणे, असे प्रकार झाल्याचे तपास पुढे आले आहे. दहशतीमुळे गप्प न बसता संबंधितांनी पुढे यावे, असे आवाहन सासवडचे पोलिस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी केले.   

सासवडसह पुरंदर तालुक्‍यात बेकायदा सावकारी जोरात सुरू आहे. पिळवणूक होणारे लोक कायद्याचा आधार न घेता आतापर्यंत दहशतीने गप्प बसत होते; पण आम्ही बेकायदा सावकारीविरुद्ध नुकतेच विशेष अभियान सुरू केले. 

त्याशिवाय पोलिस ठाण्यात सावकारीच्या तक्रारी घेण्यासाठी सहायक राजेश पोळ, अजित माने यांच्यामार्फत विशेष कक्ष स्थापन केला. या कक्षाच्या माध्यमातून आत्तापर्यंत सावकारीच्या तीन तक्रारी आल्या असून तसा गुन्हा दाखल केला आहे. काही सावकारांवर अटकेची कारवाई केली. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनीही सावकारीविरुद्धची मोहीम तीव्र करण्यास सांगितले. त्यामुळे धनदांडग्या व गुंडप्रवृत्तीच्या सावकारांचा बंदोबस्त करण्यासाठी लोकांनी न डगमगता पुढे यावे, असे आवाहन पाटील यांनी केले.  

पुरंदर तालुक्‍यात सावकारकीचा धंदा तेजी आहे. त्याची वसुली अतिशय वाईट पद्धतीने होते. अनेक जण व्याज भरून जेरीस आले आहे. जुन्या प्रकरणांत काहींचा बळी गेल्याची, काहींना जमीन विकावी लागल्याची उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या, बेकायदा सावकारांचा बंदोबस्त करून मुसक्‍या आवळल्या जात आहेत. 
- राजेश पोळ, अजित माने सहायक, सावकारी गुन्हे तक्रार कक्ष, सासवड पोलिस ठाणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT