Pune ZP 
पुणे

तीन लाखांपर्यंतच्या कामांचे पैसै ग्रामपंचायतींना पाठवणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील विकासकामांची देयके (बिले) सादर करू न शकलेल्या सर्व ग्रामपंचायतींना तीन लाख रुपयांपर्यंतच्या कामांच्या देयकांचे पैसे संबंधित ग्रामपंचायतींना पाठविण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय  जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला आहे. 

जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते  शरद बुट्टे पाटील यांनी याआधीच्या स्थायी समितीत याबाबतचा ठराव मांडला होता. तो एकमताने मंजूरही करण्यात आला होता. परंतु अद्यापपर्यंत ग्रामपंचायतींना हे पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे काल (शुक्रवारी) व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमांच्या माध्यमातून झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बुट्टे पाटील यांनी पुन्हा हा मुद्दा उपस्थित केला. अनेक गावांमध्ये विकासकामे पुर्ण झाली आहेत. परंतु यंदा कोरोनामुळे ग्रामपंचायतींना मार्च एंडपर्यंत (मार्च अखेर) या कामांची देयके जिल्हा परिषदेकडे पाठवता आली नाहीत. त्यामुळे केवळ तांत्रिक मुद्द्याअभावी ग्रामपंचायतींचे पैसे अडकून पडू नयेत. यासाठी तीन लाख रुपयांपर्यंतच्या कामांचे पैसे थेट त्यांच्या खात्यावर वर्ग करावेत, अशी मागणी बुट्टे पाटील यांनी केली. त्यांच्या मागणीला सर्वांनी पाठिंबा दिला. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी याबाबतची घोषणा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Massajog Election: मस्साजोगमध्ये अश्विनी देशमुख यांचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं; धनंजय देशमुखांची खरंच 'ती' चूक होती?

Prakash Awade Dhairyashil Mane: आवाडे- धैर्यशिल माने संघर्ष पेटणार, प्रकाश आवाडेंच्या वक्तव्यानंतर, भावी आमदार म्हणून माने समर्थकांनी डिवचलं

स्टार प्रवाहवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, प्राजक्ता गायकवाडचं ५ वर्षानंतर कमबॅक, सोबतीला 'ही' अभिनेत्री

Budget Mobile : नवीन मोबाईल घ्या बजेटमध्ये! 20 हजारच्या आत टॉप 5G स्मार्टफोन्स; बेस्ट कॅमेरा, दमदार फीचर्स अन् बरंच काही

आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाण्याइतका मी नालायक नाही, संधी दिली तर...; विधानपरिषद अन् विलीनीकरणावर बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT