PTD26A07087
आदिनाथनगर (ता. पाथर्डी) ः आमदार मोनिका राजळे यांनी ऊसतोड मजुरांसमवेत दिवाळी साजरी केली.
आमदार राजळेंची ऊसतोड कामगारांसमवेत दिवाळी
पाथर्डी, ता. ९ ः वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर असलेल्या ऊसतोड मजुरांच्या पालावर जाऊन आमदार मोनिका राजळे यांनी त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली. यावेळी राजळे यांनी मजुरांना फराळ, तर महिला कामगारांना साडी भेट दिली. कामगारांच्या झोपडीत बसून चहापान करत त्यांनी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.
पिराजी आत्माराम कीर्तने यांच्या कुटुंबातील महिला ऊसतोड कामगारांनी त्यांचे आपुलकीने स्वागत केले. यावेळी त्यांच्या कोपीत चहा घेत राजळे यांनी कामगारांच्या सुख-दुःखाची विचारपूस केली. तसेच नारायण दहिफळे यांच्याही कोपीत राजळे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांबरोबर प्रापंचिक अडीअडचणी व इतर समस्या जाणून घेत चर्चा केली.
यावेळी राजळे यांनी मुलींचे कमी वयात लग्न करू नका, १८ वर्षांपूर्वी त्यांना विवाहबंधनात अडकवू नका. आज महिलांना ज्या कष्टमय परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, ती परिस्थिती आपल्या मुलींच्या वाट्याला येऊ नये, यासाठी त्यांना उच्च शिक्षण द्या आणि स्वतःच्या पायावर उभे करा, असे आवाहन करत त्यांनी सध्या दुष्काळाची तीव्रता मोठी असली, तरीही शासन तुमच्या पाठीशी आहे. राज्य शासनाने पाच हजार रुपयांची मदत दिली असून, पुढील वर्षी सुद्धा दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याने सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब किलबिले, संचालक राहुल राजळे, उद्धव वाघ, श्रीकांत मिसाळ, रामकिसन काकडे, बाळासाहेब गोल्हार, नारायण काकडे, सचिन लोखंडे, कुशिनाथ बर्डे, बापूसाहेब पाटेकर, दीपक अंदुरे, रवींद्र महाजन, विनायक म्हस्के हे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.