पुणे

आडाचीवाडीत वानरांचा महिलेवर हल्ला

CD

वाल्हे, ता. २७ : परिसरातील हनुमानवस्ती आणि आडाचीवाडी येथे गेल्या अनेक दिवसांपासून वानरांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे रविवारी (ता. २५) घराच्या अंगणात बसलेल्या ९० वर्षीय समिंद्रा शिवाजी पवार यांच्यावर चार ते पाच वानरांच्या कळपाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्यांच्या हात आणि पायाला जखमा झाल्या.
अन्न-पाण्याच्या शोधात आलेल्या चार ते पाच वानरांच्या कळपाने अचानक पवार यांच्या दिशेने झेप घेतली. वानरांमुळे घाबरलेल्या पवार यांनी त्यांना दूर करण्यासाठी आरडाओरडा केला. यावेळी एका वानराने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. वानराच्या नखांमुळे त्यांच्या हाताला आणि पायाला ओरखडे पडून जखमा झाल्या. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारील नागरिक तातडीने मदतीसाठी धावून आले. नागरिक जमा झाल्याचे पाहताच वानरांनी तेथून पळ काढला.
परिसरात वानरांच्या टोळ्या घरांच्या छतांवर उड्या मारत असल्याने कौले फुटून नुकसान होत आहे. याशिवाय भुईमूग, सूर्यफूल यांसह विविध पिकांचेही नुकसान होत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आडाचीवाडी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हनुमंत पवार यांनी वनविभागाशी संपर्क साधून वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमी समिंद्रा पवार यांची विचारपूस केली, अशी माहिती हनुमंत पवार यांनी दिली.
वानरांचा वाढता उपद्रव लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात. तसेच वानरांसह रानडुकरांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीवरही उपाय करावेत, अशी मागणी युवा उद्योजक अथर्व पवार यांच्यासह ग्रामस्थांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

SCROLL FOR NEXT