Rain esakal
पुणे

Pune Rain : पुणे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्के कमी पाऊस

पुणे - जिल्ह्यात उशीरा दाखल झालेल्या मॉन्सूनने पहिल्या दिवसापासूनच बरसण्यास सुरवात केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यात उशीरा दाखल झालेल्या मॉन्सूनने पहिल्या दिवसापासूनच बरसण्यास सुरवात केली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात घाटमाथ्यासह अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र, अजूनही जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत २७ टक्के कमी पाऊस पडला असून, ७५ मिलिमीटर पावसाची तूट कायम आहे.

अरबी समुद्रात गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा. तसेच दक्षिणेत असलेला मॉन्सूनचा आस यामुळे देशभरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, अजूनही पुणे जिल्ह्याला जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. मागील काही दिवसांपासून पावसाची रिमझीम कमी झाली असून, उघडीपही वाढली आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात २८४ मिलिमीटर पावसाची नोंद होणे आवश्यक होते. मात्र, आजवर २०९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः ढगाळ, तर हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच काळात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

SCROLL FOR NEXT