पुणे

agnMonsoon-May -18_txt.txt

CD

पान १

मॉन्सूनने संपूर्ण अंदमान व्यापले

श्रीलंका, कोमोरिन भागांत प्रगती

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता.१६) अंदमानात आगमन झाले. त्यानंतर आपली वाटचाल सुरूच ठेवत मॉन्सूनने सोमवारी (ता. १८) संपूर्ण अंदमान बेटे, श्रींलंकेचा काही भाग आणि कोमोरीन भागात प्रगती केली असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मॉन्सूनने शनिवारी (ता.१६) आग्नेय बंगालचा उपसागर, अंदमान, निकोबार बेटे, अंदमान समुद्र, आणि अरबी समुद्राच्या काही भागांत प्रगती सुरू केली. त्यानंतर सोमवारी (ता. १८) वेगाने प्रवास करत संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागराचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राच्या आणखी काही भागांसह मॉन्सूनने देशाच्या दक्षिणकडील आणि श्रीलंकेच्या पश्चिमेकडे असलेल्या कोमोरिन भागात प्रगती केली आहे.
येत्या तीन ते चार दिवसांत आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन भागांसह बंगालच्या उपसागचा आणखी काही भाग, संपूर्ण अंदमान समुद्रात मॉन्सून पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संपूर्ण अंदमान-निकोबार बेट समूह व्यापून श्रीलंकेचा जवळपास निम्मा भाग व्यापल्यानंतर मॉन्सून यंदा २६ मेपर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत आहेत.

फोटो आहे. (agnMonsoon Adavance 2026)
फोटो ओळ : नकाशातील निळी रेषा मॉन्सूनच्या वाटचालीची स्थिती दर्शवते. (सौजन्य : हवामान विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siya Goyal Snapchat Chat Viral : सिया गोयल प्रकरणात नवा ट्विस्ट; मैत्रिणीसोबतचे स्नॅपचॅट चॅट व्हायरल, 'लग्न होणार नाही तरीही तिकीट काढते', तपासाला नवे वळण?

Mumbai Dam Storage: मुंबईकरांचा पाणी कपातीचा प्रश्न मिटणार? धरण क्षेत्रात मोठा पाऊस, पाणी साठा किती वाढला?

Latest Marathi Live Update: पुढील काही तासांत मुसळधार सरींची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहावे

बारावीत असताना झालेलं पहिलं लग्न; १७ वर्षांनी घेतला काडीमोड, का मोडलेला नागराज मंजुळेंचा संसार?

Mhada Lottery: म्हाडाच्या घरांची बंपर लॉटरी! मुंबईत घराचं स्वप्न पूर्ण होणार, ८ हजार घरांची सोडत; कधी होणार?

SCROLL FOR NEXT