Cloudy Weather sakal
पुणे

Pune Monsoon : शहरात ढगाळ हवामान कायम; मॉन्सूनच्या आगमनाची पुणेकरांना प्रतिक्षाच

मॉन्सूनच्या आगमनाची पुणेकरांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे. पोषक वातावरण असले तरी अजूनही मॉन्सूनची पाहिजे तशी प्रगती झालेली नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - मॉन्सूनच्या आगमनाची पुणेकरांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे. पोषक वातावरण असले तरी अजूनही मॉन्सूनची पाहिजे तशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी शहरात आकाश अंशतः ढगाळ राहील तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

बुधवारी शहरात दिवसभर ढगाळ हवामान असले तरी काहीसा उकाडा जाणवत होता. कडाक्याचे ऊन नसले तरी सरासरी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्यातही मॉन्सूनचे लांबलेले आगमन, पूर्वमोसमी पावसाची दडी व उन्हाच्या वाढलेल्या झळा यामुळे पावसाची जोरदार प्रतीक्षा आहे.

गुरुवारपासून (ता. २२) कोकणात पावसाला सुरवात होईल. तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात वादळी पावसासह तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे. पावसाला पोषक हवामान होताच, पूर्वमोसमीचे ढग गोळा होऊ लागले आहेत.

मॉन्सूनची प्रगती ‘जैसे थे’....

आठवडाभरापासून थांबलेली मॉन्सूनची वाटचाल सोमवारी (ता. १९) पुन्हा सुरू झाली. कर्नाटक, आंध्र प्रदेशचा आणखी काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार राज्याच्या काही भागात मॉन्सूनने आगेकूच केली.

बुधवारी (ता. २१) मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. शनिवारपर्यंत (ता. २४) दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहारचा आणखी काही भाग, तसेच ओडिशा आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT