Monsoon likely to exit of North Maharashtra in 48 hours weather forecast imd pune sakal
पुणे

Monsoon Update : मॉन्सून ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातून बाहेर

‘मॉन्सून’चा परतीचा प्रवास सध्या कायम असून, देशातील अजून काही भागांमधून परतीसाठी पोषक वातावरण तयार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘मॉन्सून’चा परतीचा प्रवास सध्या कायम असून, देशातील अजून काही भागांमधून परतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे आता उन्हाचा ताप वाढू लागला आहे. मॉन्सूनने संपूर्ण राजस्थानसह गुजरातच्या बहुतांश भागातून माघार घेतली आहे. पश्चिम बंगालच्या दक्षिण भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय झाली आहे. या प्रणालीपासून पूर्व उत्तर प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यातही मुख्यतः कोरड्या हवामानाची स्थिती असून, उन्हाचे चटके अधिक जाणवू लागले आहेत. राज्यातील बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात वाढ होत आहे.

हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम काश्‍यपी म्हणाले, ‘‘उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा, विदर्भाच्या काही भागांत कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होऊन पुढील दोन दिवसांत मॉन्सून माघार घेण्याची शक्यता आहे. सध्या दक्षिण महाराष्ट्रात काही ठिकाणी असलेल्या आर्द्रतेमुळे अद्याप हलक्या पावसाची शक्यता आहे. परंतु, पुढील चार ते पाच दिवसांत या भागातूनही मॉन्सून परतण्याची चिन्हे आहेत.’’

हवामानशास्त्र विभागाने पुण्यातून मॉन्सून परतण्यासाठीची सर्वसाधारण तारीख नऊ ऑक्टोबर जाहीर केली आहे. दरम्यान, परतीसाठी पोषक हवामान झाल्याने येत्या दोन दिवसांमध्ये जम्मू-काश्‍मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्‍चिम उत्तर प्रदेश, पश्‍चिम मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या काही भागांतून मॉन्सून बाहेर पडण्याचा अंदाज आहे.

उन्हाचा चटका कायम राहणार

पावसाने काढता पाय घेताच शहरात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. त्यात सरासरीच्या खाली गेलेल्या कमाल तापमानात वाढ झाली. पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात निरभ्र वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे उन्हाचा ताप जाणवणार आहे. शहरात गुरुवारी ३२.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा तापमानात किंचित वाढ झाली असून किमान तापमानात मात्र घट झाली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हवामानाची स्थिती बदलली आहे. निरभ्र आकाश आणि पावसाने उघडीप दिल्याने उन्हापासून बचाव करताना नागरिक दिसत आहेत. उन्हाच्या झळा तीव्र असल्यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे काहीसे अवघड झाले आहे. त्यात कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढू लागल्याने ऑक्टोबर हीटचा प्रभाव काहीसा जाणवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

'म्हातारपणात स्वतःची माती कशाला...' प्रसिद्ध अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...'हे करण्यापेक्षा चारधाम यात्रा...'

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

SCROLL FOR NEXT