पुणे

agnMonsoon-June - 24_txt.txt

CD

मोसमी वाऱ्यांचे
महाराष्ट्रावर अधिपत्य
---
तीन दिवसांत राज्य व्यापले, आता दमदार पावसाची प्रतीक्षा
---
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) प्रवाह वाढल्याने देशातील वाटचालीत वेग पकडला आहे. अरबी समुद्रावरून प्रवास सुरू होताच बुधवारी (ता. २४) अवघ्या तीन दिवसांत मोसमी वाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्र कवेत घेतला आहे. राज्यात सर्वदूर कमी-अधिक पावसाने हजेरी लावली असून, आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
यंदाच्या मॉन्सून हंगामावर ‘एल निनो’चे सावट आहे. यातच केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनने संपूर्ण महाराष्ट्रातील आगमनाला उशीर केला. परिणामी, शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. अरबी समुद्रावरून जवळपास पंधरा दिवस थबकलेल्या नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी चांगलाच वेग धरत बुधवारी (ता. २४) संपूर्ण महाराष्ट्र आधिपत्याखाली घेतला आहे.
यंदा ६ जून रोजी मॉन्सून एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल झाली. ८ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत मॉन्सूनने मजल मारली. त्यानंतर मात्र अरबी समुद्रावरून मॉन्सूनची चाल थांबली होती. तब्बल दोन आठवड्यानंतर सोमवारी (ता. २२) पुढे चाल करत मॉन्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केली होती.
दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (ता. २३) मॉन्सूनने जवळपास कोकण आणि मराठवाडा व्यापला. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मॉन्सूनने प्रगती केली. बुधवारी (ता. २४)तिसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भाचा राहिलेला भागात दाखल होत मोसमी वारे संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहे. मॉन्सूनने गुजरात, मध्य प्रदेशाचा काही भाग व्यापला असून, छत्तीसगड आणि झारखंडच्या आणखी काही भागात वाटचाल केली आहे.
मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक स्थिती असल्याने पुढील दोन ते तीन दिवसांत अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेशचा आणखी काही भाग, छत्तीसगड, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग, तसेच उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
---
फोटो आहे. (agnMonsoon Advance २०२६)
नकाशातील निळी रेषा मॉन्सूनच्या वाटचालीची स्थिती दर्शविते. (सौजन्य : हवामान विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Dhabi Visa: भारतीय पर्यटकांसाठी खुशखबर! अबू धाबीचा UAE व्हिसा मोफत मिळणार, अटी काय अन् कुणाला फायदा होणार?

India Unemployment Rate: तरुणांसाठी नोकरीची चिंता कायम! देशातील बेरोजगारीची स्थिती ‘जैसे थे’; दर ५.५ टक्क्यांवर स्थिर

विद्यार्थ्यांनो, तुमच्या हातात बदलाची ताकद! गावाची समस्या जगासमोर मांडा; साम टीव्ही देतंय ‘Next Gen Reporter’चं व्यासपीठ

Pune Grand Tour : पुणे ग्रँड टूरसाठी ४१३ किमीचे नवीन रस्ते; ६२७ कोटींचा खर्च

Nutritious Diet : पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांची ताटे रिकामीच! कुठे तेल आहे तर तांदूळ नाही, हळद आहे तर जिरे-मोहरी नाही

SCROLL FOR NEXT