पुणे

सातारा जिल्ह्यात वरुणराजाचे आगमन

CD

सातारा जिल्ह्यात
मान्सूनचे आगमन

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या मान्सूनने अखेर सातारा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. सातारा, पाचगणी, खंडाळा, कवठे तसेच कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप पेरण्यांना गती मिळण्याची चिन्हे आहेत.
सातारा शहरासह तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारपर्यंत ऊन-पावसाचा खेळ सुरू होता, मात्र त्यानंतर रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस कायम राहिला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली.
थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाचगणीतही पावसाने दमदार हजेरी लावली. पहिल्याच पावसानंतर टेबल लँड आणि पारसी पॉइंट परिसर धुक्याच्या चादरीने वेढला गेला होता. या निसर्गरम्य वातावरणाचा पर्यटकांनी मनमुराद आनंद घेतला. दरम्यान, मंगळवारी दुपारी पाचगणी बाजारपेठेतील भाजी मंडईमागील एक जुना आणि मोठा सिल्व्हर ओक वृक्ष उन्मळून पडून टाऊन हॉल इमारतीवर कोसळला. या घटनेत इमारतीच्या छताचे आणि पत्र्याचे नुकसान झाले.
पाटण तालुका आणि कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही सकाळपासून पावसाचा जोर कायम होता. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे ६१ मिलिमीटर, नवजा येथे ५२ मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे ४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या कोयना धरणात ८.८३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
खंडाळा तालुका तसेच वाई-कवठे परिसरातही दुपारपासून रिमझिम पावसाने हजेरी लावली. सायंकाळपर्यंत अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. पूर्वमोसमी पावसाने हुलकावणी दिल्याने गेल्या महिनाभरापासून शेतकरी चिंतेत होते. मात्र, मान्सूनच्या आगमनामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून शेतकऱ्यांनी बियाणे व खत खरेदीलाही सुरुवात केली आहे.
बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले असून अधूनमधून तुरळक सरींची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणे शहर ठप्प! पावसाने रस्ते जलमय, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक विस्कळित

Deglur Bhukhand: कर्मचाऱ्यांसाठीचे भूखंड इतरांच्या घशात? देगलूर प्रकरणात चौकशीचे आदेश, सहकार क्षेत्रात खळबळ

Mumbai Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील 'या' कोंडीतून होणार कायमची सुटका! राणेनगरमध्ये नक्की काय बदलणार? पाहा महत्त्वाची अपडेट

ICC Ranking: जसप्रीत बुमराहला जबरदस्त धक्का... मॅट हेन्रीने न्यूझीलंडचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला; Joe Root पुन्हा टॉपर ठरला

Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

SCROLL FOR NEXT