पुणे

लोकसहभागातून आदर्श शाळेची उभारणी

CD

मंचर, ता. १६ : मोरडेवाडी- मंचर (ता. आंबेगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात अवघ्या दीड किलोमीटर अंतरात नामवंत पाच इंग्रजी माध्यमांच्या शाळा कार्यरत असतानाही येथील शाळा गुणवत्ता व सर्वांगीण परिसर विकासात अग्रेसर ठरत आहे. ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती व देणगीदारांच्या सहभागातून भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
सध्या विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमाकडे अधिक असला, तरी या मराठी माध्यमाच्या शाळेने पालकांचा विश्वास संपादन केला असून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत राहावे लागत आहे. ही शाळा नावीन्यपूर्ण उपक्रम व गुणवत्तापूर्ण शिक्षणात अग्रेसर आहे. येथील विद्यार्थी नासा अमेरिका येथे नुकतेच गेले होते. राज्यातच नव्हे तर देशपातळीवर ओळख निर्माण करणारी अव्वल शाळा ठरली आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून एलसीडी प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही व डिजिटल साधनांच्या साहाय्याने अध्यापन केले जाते. शाळेत सध्या ५१७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे राहू नये, यासाठी विविध शासकीय स्पर्धा परीक्षेचे, कला, क्रीडा यासंदर्भात मार्गदर्शन केले जाते.
मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले यांच्या कार्यकाळात १२१ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.

वैशिष्ट्ये
-जिल्हा परिषद व आयुका परीक्षेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नासा(अमेरिका) येथे सिद्धी माझीरे, रुद्र मोरडे यांची भेट
-राष्ट्रपती भवन, एनडीए खडकवासला येथे विद्यार्थी भेट

उपक्रम
-वार्षिक कमलजादेवी सांस्कृतिक महोत्सव
-‘एक दिवस शाळेसाठी’ उपक्रम
-शास्त्रज्ञ, साहित्यिक, लेखक, डॉक्टर, वकील, प्रशासकीय अधिकारी यांचे संस्कार व मार्गदर्शन वर्ग
-पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शाळेत शालेय परसबाग विकसित

सुविधा
-३८ संगणकांची स्वतंत्र संगणक प्रयोग शाळा
-विज्ञान प्रयोगशाळा
-५ हजाराहून अधिक पुस्तकांचे ग्रंथालय
-१५ वर्गांमध्ये स्मार्ट टीव्ही, संगणक व ई-साहित्य
-निसर्गरम्य व बोलक्या भिंती
-भिंतींवर शैक्षणिक चित्रे, पाढे, कविता, सामान्य ज्ञान


सीएसआर फंडातून विकासकामे
-आयडीबीआय बँक मंचर - तीन स्मार्ट टीव्ही -९३ हजार रुपये
-आयसीआयसीआय फाउंडेशन- पाच किलोवॅट सोलर सिस्टीम- ५ लाख रुपये व शुध्द पाणी प्रकल्प -४८ हजार रुपये,
-इमारत व स्वच्छतागृह उभारणी - लोकसहभागातून २६ लाखांच्या तीन वर्गखोल्या
-सिनेक्रोन प्रायव्हेट लिमिटेड - शाळा सुधार योजना ८लाख ४० हजार रुपयांचे स्वच्छतागृह
-मोरडे फूड्स प्रायव्हेट लिमिटेड -७२ लाख रुपयांच्या चार वर्गखोल्या व स्वच्छतागृहे.
-सन-२०२५–२६ : दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने २९ लाख रुपयांच्या तीन वर्गखोल्या
-एकूण सात खोल्यांची दोन मजली इमारत


पुरस्कार
-पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष चषक-२०१४
-शाळा मूल्यांकन गुणवत्ता चषक-२०१५
-आयएसओ ९००१ :२००१ मानांकन प्राप्त एप्रिल २०१४
-मुख्याध्यापक शैलेंद्र चिखले यांना आदर्श राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

मंचर परिसरातील अनेक इंग्रजी माध्यमातील शाळेतील विद्यार्थ्यांनी मोरडेवाडी शाळेत प्रवेश घेतला आहे. आंबेगाव तालुक्यातील
एकमेव उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी शिक्षण देणारी व मुलांसाठी वेळोवेळी संस्कार शिबिर व पालक मेळावे घेणारी शाळा आहे. शाळेतील अनेक विद्यार्थी, डॉक्टर, अभियंते व उच्च प्रशासकीय अधिकारी आहेत विशेष म्हणजे शिक्षक व विद्यार्थ्यांनीही आर्थिक मदत दिली आहे.
-रूपाली धोका, गटशिक्षण अधिकारी, आंबेगाव तालुका पंचायत समिती घोडेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : मुंबईतील निकालानंतर किरीट सोमैय्यांनी राज ठाकरेंना डिवचलं, काय म्हणाले? वाचा...

Kolhapur Election Party Wise Winners : कोल्हापूर महानगरपालिका पक्षनिहाय विजयी उमेदवार लिस्ट, जाणून घ्या पक्षीय बलाबल

MBMC Results: मीरा-भाईंदरमध्ये भाजप मोठ्या फरकाने सत्तेत येणार! इतर पक्षांना मोठा फटका; जाणून घ्या विजयी उमेदवारांची यादी

ना राधा पाटील ना दीपाली सय्यद; 'या' सदस्याला मिळालीत सगळ्यात जास्त मतं; पाहा 'बिग बॉस मराठी ६'चा व्होटिंग ट्रेंड

Kharmas Restrictions: खरमास संपला तरी विवाह-गृहप्रवेशावर निर्बंध का? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT