मोरगाव, थेऊर, सिद्धटेक
उद्यापासून दर्शनासाठी बंद
पिंपरी, ता. ८ ः अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आठही मंदिरांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यासाठी मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील अष्टविनायक मंदिरे रविवारपासून (ता. १०) नऊ जूनपर्यंत दर्शनासाठी बंद राहतील, अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी दिली.
पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली या कामासाठी राज्य शासनाने निधी दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या मंदिरांची कामे सुरू आहेत. सध्या मुख्य मंदिर आणि परिसरातील कामे प्रगतिपथावर आहेत. मुख्य गाभारा आणि सभामंडपांचे पौराणिक काळाप्रमाणे पाषाणाचे सुबक बांधकाम केले जाईल. मंदिरे भक्तांसाठी खुली ठेवल्यास कामाचा कालावधी वाढू शकेल. त्यामुळे पुरातत्त्व विभाग आणि चिंचवड देवस्थान ट्रस्टने ही मंदिरे एकाच वेळी बंद ठेवण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडे विनंती अर्ज केला होता. त्यावर सहधर्मादाय आयुक्तांनी पुरातत्त्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी आणि ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर परवानगी दिली. त्यानुसार शुक्रवारी (ता. ८) तिन्ही ठिकाणी ग्रामसभा या आदेशाची माहिती देण्यात आली.
महत्त्वाच्या सूचना
- नित्य पूजा सुरू राहणार ः मंदिरे दर्शनासाठी बंद असली तरी श्रींची नित्य पूजाअर्चा व धार्मिक विधी नियमानुसार सुरू
- थेट दर्शन बंद ः १० मे ते ९ जून दरम्यान, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा नाही
- प्रवेशावर निर्बंध ः मंदिरांचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश नाही
श्रीक्षेत्र मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील विकासकामे ही दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहेत. ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी तीनही मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्यात येत आहेत. भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या कामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा, पोलिस व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे.
- मंदार महाराज देव, मुख्य विश्वस्त, चिंचवड देवस्थान ट्रस्ट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.