corona1
corona1 
पुणे

मुळशीकरांनो, आकडा वाढतोय...कोरोनाने ओलांडला द्विशतकाचा टप्पा  

धोंडिबा कुंभार

पिरंगुट (पुणे)  : मुळशी तालुक्यात कोरोनाने आज द्विशतक ओलांडल्याने धोका वाढला आहे. आज तालु्क्यात नवीन १८  कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून, 
आता तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या २०५ वर पोचली आहे. 

मुळशी तालुक्यात आज सापडलेल्या रुग्णांत तेरा पुरुष, तर पाच महिलांचा समावेश असून, सर्वाधिक आठ रुग्ण भुकूम येथे सापडले आहेत.  आज भुकूम येथे आठ, सूसला दोन, नांदे येथे एक, दारवली (धनवेवाडी) येथे तीन, रिहे येथे एक, शिंदेवाडी येथे दोन, तर लवळे येथे एक कोरोनाबाधित सापडला आहे. तालुक्यात बरे झालेले रुग्ण एकूण ५६ असून आज तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत तालुक्यातील मृतांची संख्या पाच झाली आहे.

दरम्यान, मुळशी तालुक्यातील बहुतांशी गावांत सुरू केलेला जनता कर्फ्यू आज सकाळी रद्द करण्यात आला आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार, 
लॅाकडाउन सोमवारी मध्यरात्रीपासून होणार असल्याने पिरंगुट व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी पुकारलेला जनता कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे 
ग्रामस्थांनी आज जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी विविध दुकानांसमोर गर्दी केली होती. 

सध्या आखाड महिना असल्याने उद्याचा रविवारचा दिवसही महत्त्वाचा आहे.  उद्या मटण, मासळी तसेच अन्य मांसाहारी खाद्य पदार्थ खरेदी करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खवय्यांची उद्या मटण व मासे खरेदीसाठी झुंबड उडणार आहे. त्यातही या सोशल डिस्टन्सचा फज्जा उडण्याची दाट शक्यता आहे. 
  
Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT