पुणे

पुण्यात आज तब्बल 55 रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यात आज दिवसभरात दोन हजार 403 नवे कोरोनारुग्ण आढळून आले आहेत. कालच्या तुलनेत आज दिवसभरातील एकूण कोरोना रुग्णांत 198 ने घट झाली आहे. मात्र आज मृत्यूच्या संख्येने उच्चांक केला आहे. आज तब्बल 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 452 रुग्णांचा समावेश आहे. आज नोंदल्या गेलेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवडमधील 560, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 295 आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डातील मिळून 96 नव्या रुग्णांचा समावेश आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 56 हजार 416 झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मृतांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 70, पिंपरी चिंचवडमधील 250 आणि ग्रामीण भागातील (नगरपालिका, कॅंटोन्मेंट बोर्डासह) 118 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजअखेरपर्यंत एकूण 1 हजार 442 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

शहरात 238 ने रुग्ण संख्या घटली 
दरम्यान, कालच्या तुलनेत आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसभराच्या रुग्ण संख्येत आज घट झाली असून ग्रामीण भागातील रुग्णसंख्या मात्र वाढली आहे. पुणे शहरात आज 238 व पिंपरी-चिंचवडमध्ये 97 रुग्णांची घट झाली आहे. याउलट ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये मात्र 124 ने कॅंटोन्मेंट बोर्डातील रुग्णांमध्ये 13 ने वाढ झाली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT