PUNE SAKAL
पुणे

पुण्यात कोरोना रुग्णांच्या तुलनेत अधिक जण कोरोनामुक्त

सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात सोमवारी (ता.१८) दिवसातील नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत दुपटीहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २५५ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट ५१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

दिवसभरात एकूण रुग्णांमध्ये जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील सर्वाधिक १२६ रुग्णांचा समावेश आहे. पुणे शहरात ७० पिंपरी चिंचवडमध्ये ३३, नगरपालिका हद्दीत २४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात केवळ दोन नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये सर्वाधिक चार मृत्यू हे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि नगरपालिका हद्दीतील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसात कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

कोरोनामुक्त रुग्णांमध्येही जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील सर्वाधिक २५९ जणांचा समावेश आहे. पुणे शहरातील १२२, पिंपरी चिंचवडमधील ८४, नगरपालिका हद्दीतील ३९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील क्षेत्रनिहाय कोरोनामुक्त

आतापर्यंत झालेले एकूण कोरोनामुक्त --- ११ लाख २३ हजार ९८५

  1. पुणे शहर --- ४ लाख ९३ हजार १७

  2. पिंपरी चिंचवड --- २ लाख ७० हजार ७९४

  3. जिल्हा परिषद कार्यक्षेत्र --- २ लाख ७९ हजार ८२५

  4. नगरपालिका क्षेत्र --- ६३ हजार ७०८

  5. कॅंटोन्मेंट बोर्ड --- १६ हजार ४८१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT